Headlines

बोअरवेलला नवसंजीवनी:मेळघाटात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रयोगामुळे भूजल पातळी वाढली, घराच्या छतावरून पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत‎




डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या मेळघाटातील अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. यावर मात करण्याच्यादृष्टीने एक शास्वत प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरुन वाहून जाणारे पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत पोहोचविण्यात आल्याने एका बोअरवेललाही नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा हाआदर्श उभा केला आहे दरवर्षी उन्हाळा आला की पाण्यासाठी हाहाकार, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स, घटणारी भूजल पातळी आणि वाढती पाणीटंचाई असे मेळघाटचे चित्र असते. अशावेळी हा छोटासा प्रयोग अत्यंत महत्वाचा ठरला असून त्या प्रयोगामुळे किमान एका गावचा तरी प्रश्न सुटायला मदत झाली आहे. शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूल व उच्च माध्यमिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, धारणी येथे वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या योगेश मालवीय यांनी हा प्रयोग केला आहे. आपल्या राहत्या घरावर कोसळणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखत त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग”ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. आज त्या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून गावातील बोअरवेलमधून पाणी मिळवणे शक्य झाले आहे. पावसाचे लाखो लिटर पाणी दरवर्षी वाहून जाते. तेच पाणी जमिनीत जिरले तर कित्येक बोअरवेल्सना जीवनदान मिळू शकते, हा विचार मनात रुजताच योगेश मालवीय यांनी मार्च महिन्यातच ठाम निर्धार केला की येणाऱ्या पावसाळ्यात घराच्या स्लॅबवर पडणारा एकही थेंब वाया जाऊ द्यायचा नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या निवासस्थानी प्रत्यक्ष नियोजन सुरू केले. या नियोजनामागचा उद्देश केवळ पाणी साठवणे नव्हता, तर ते पाणी जमिनीच्या गर्भात झिरपवून भूजल पुनर्भरण करणे हा होता. त्यामुळे टाक्यातील पाणी पुढे बोअरवेल परिसरातून जमिनीत मुरले. सुदैवाने यंदा १७ जून रोजी धारणी शहरात पावसाची दमदार सुरुवात झाली. पहिला पाऊस छान बरसला त्यापश्चातही सतत अनेक वेळा चांगला पाऊस झाला. या काळात स्लॅबवर पडणारे संपूर्ण पावसाचे पाणी नव्याने उभारलेल्या व्यवस्थेतून टाक्यात जमा होऊन जमिनीच्या गर्भात झिरपत राहिले आणि अवध्याच काही दिवसांत या प्रयोगाचा परिणाम दिसून येऊ लागला. पूर्वी बोअरवेलमधून पाणी येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता अवध्या एका मिनिटात पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. अशी केली प्रत्यक्ष कृती तलई कॅम्प परिसरातील घराच्या आवारात असलेल्या बोअरवेलच्या शेजारी सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला. सिमेंट आणि विटांच्या साहाय्याने मजबूत, टिकाऊ आणि शास्त्रीय पद्धतीचे जलसंचय टाके बांधण्यात आले. घराच्या संपूर्ण स्लॅबवरून वाहणारे पावसाचे पाणी थेट या टाक्यात पोहोचावे, यासाठी स्वतंत्र पाइपलाइन प्रणाली विकसित केली. घराच्या एका कोपऱ्यात तयार केलेला छोटा हौद.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *