Headlines

उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात रुग्णाचे उपोषण:चुकीचे इंजेक्शन आणि ऑपरेशन केल्याचा आरोप‎




येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरोधात आणि संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सागर दत्तात्रय गंगथडे या रुग्णाने गुरुवार, दि. ०२ जुलै पासून उपजिल्हा रुग्णालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते सागर गंगथडे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान, चुकीचे इंजेक्शन देण्यात आले होते. यामुळे त्यांच्या शरीरावर गाठ निर्माण झाली. त्यानंतर, संबंधित डॉक्टर मुकुंद जामदार यांनी त्या गाठीवर चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केले, ज्यामुळे ती जखम बरी होण्याऐवजी आणखी जास्त गंभीर आणि मोठी झाली. ४ ते ५ महिन्यांपासून जखम कायम असून रुग्णाची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नसताना आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाच्या या बेजबाबदार आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे रुग्णाला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. डॉ. मुकुंद जामदार यांच्या निलंबनाची मागणी उपजिल्हा रुग्णालयातील सर्जन स्पेशालिस्ट डॉक्टर मुकुंद जामदार यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या उपोषण आंदोलनाला स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर निलंबनाची ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *