पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य!:विक्रम काकडे की सुनील टिंगरे? अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम; निष्ठावंतांची खदखद
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून नवा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. पक्षाकडून विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विक्रम काकडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून…