Headlines

कॉर्पोरेट जिहाद:आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करा अन् फाशी द्या, घरावर बुलडोझर चालवा, नमाज सक्ती हिंदुस्तानात चालणार नाही- देवयानी फरांदे




नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून तपासाचा आवाका वाढत आहे. यावर बोलताना भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असे भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी म्हटले आहे. देवयानी फरांदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने हिंदूच्या मुलींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. त्यांना नमाज पडायला लावताय, रोजे ठेवायला लावताय त्यांचे धर्मांतर करताय हे हिंदुस्तानमध्ये चालणार नाही. असे जे कोणी धर्मांतर करायला लावत असतील त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करावे, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. दिल्ली टीमची धडक नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला असून, परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 20 दिवसांपासून निदा खान फरार नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. निदा खान ही गेल्या जवळपास 20 दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तीन स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. निदा खान कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीच या संपूर्ण प्रकारणात प्रमुख भूमिका बजावत होती. विदेशी अर्थसहाय्याबाबत निदा सापडल्यानंतर स्पष्टता प्रकरणातील मुख्य संशयित, मूळची पुण्याची असलेली कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान ही गेल्या दहा दिवसांपासून फरार आहे. ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसून, नाशिक पोलिसांची विविध पथके तिच्या मागावर आहेत. तिच्या अटकेनंतरच या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर येण्याची आणि या कारस्थानामागे मलेशिया कनेक्शन किंवा विदेशी संस्थांचे अर्थसाहाय्य आहे की स्थानिक पातळीवरच कुठली संस्था मदत करत आहे, हे सत्य उघडकीस येईल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. कट्टरपंथीयांच्या संस्था, फॉरेन फंडिंगचा शोध या गुन्ह्यात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून निदा खान हिचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या गुन्ह्यात संशयितांना काही कट्टरपंथीय संस्था मदत करत होत्या का? आणि फॉरेन कंपन्यांनी अर्थसाहाय्य केले का? याचा तपास केला जाईल. मात्र, अद्याप याबाबत काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *