Headlines

शक्तीपीठ विरोधात 3 गावातील शेतकरी आक्रमक‎:15-20 फूट उंचीच्या महामार्गामुळे शेती धोक्यात; रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा‎

बार्शी तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनक्षोभ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तडवळे, यावली आणि ढोराळे या तीन गावांतील शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी एकवटले असून, “कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही,” या ठाम भूमिकेसह तीव्र आंदोलनाचे र . प्रस्तावित महामार्ग सुमारे १५ ते २० फूट उंचीवरून जाणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विस्कळीत दळणवळण, उंच रस्त्यामुळे शेतात…

Read More

मोहोळमधील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत:24 हजार हेक्टरवरील खरिपाची पेरणी खोळंबली‎, बियाणे विक्रेते हवालदिल

गतवर्षी मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता, गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात २१३.१० मीमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी १ जून उजाडला तरी अद्याप पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते हवालदिल झाले आहेत. गतवर्षी मे महिन्यातच वरून राजाने दमदार हजेरी लावत मोहोळ तालुक्यात शेतात पाणी पाणी केले होते. यंदा मात्र…

Read More

'या दहशतवादाला मुळापासून संपवणे खूप आवश्यक':सूर्याच्या हत्येप्रकरणी देवोलीना संतापली, म्हणाली- आई-वडिलांसह सर्वांना फाशी द्यायला पाहिजे

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये झालेल्या सूर्या चौहान हत्याकांडाबाबत टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देवोलीना यांनी लिहिले की, ‘या दहशतवादाला मुळापासून संपवणे खूप महत्त्वाचे आहे. वाईट विचार, वाईट संगोपन आणि वाईट संस्कार असलेल्यांना, आई-वडिलांसह सर्वांना फाशी दिली पाहिजे.’ अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘योगी आदित्यनाथ, जर दुर्मिळातील दुर्मिळ (rarest…

Read More

मेरठमध्ये पतीने 40 वर्षीय इन्फ्लुएंसरची केली हत्या:बेडरूममधून ओढून हॉलमध्ये आणले, चाकूने भोसकले; नंतर स्वतःवर वार केले

मेरठमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निशा चौहान (40) यांची शुक्रवारी सकाळी 6 वाजता पतीने चाकूने भोसकून हत्या केली. घटनेनंतर पती प्रदीप चौहान (42) यांनी स्वतःवरही अनेक वार केले. ते गंभीर जखमी झाले. मुले ओरडत-किंचाळत बाहेर आली. शेजारी आत पोहोचले तेव्हा फरशीवर निशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. काही अंतरावर जखमी प्रदीपही वेदनेने विव्हळत होता. माहिती मिळाल्यावर पोहोचलेल्या…

Read More

बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा:ओळखीचा गैरफायदा घेत महिलेच्या घरात शिरला, अश्लील मागणी केल्याचा आरोप

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात राजकीय पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरोधात एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

गीता मालुसरेने इंग्लिश चॅनेल यशस्वीरित्या पार केले:11 शस्त्रक्रिया अन् शारीरिक वेदनांवर मात करत रचला इतिहास

मुळशीची ‘जलपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीता दिपा महेश मालुसरे हिने जागतिक जलतरण क्षेत्रात नवा विक्रम रचला आहे. तिने अत्यंत खडतर मानली जाणारी ‘इंग्लिश खाडी’ (इंग्लिश चॅनेल) यशस्वीरीत्या पार केली. समुद्रातील वेगवान लाटांमुळे मूळ 35 किलोमीटरचे अंतर प्रत्यक्ष पोहताना तब्बल 54 किलोमीटर झाले होते, जे तिने 14 तास 31 मिनिटांत पूर्ण केले. गीताचा हा प्रवास संघर्षमय…

Read More

अभिनेत्री अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय दरवर्षी देतात हा पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता…

Read More

मेगा शिक्षक भरतीला हिरवा कंदील:जुन्या नियमात बदल, 31 मेपर्यंत हजारो पदांसाठी मोठी संधी; पवित्र पोर्टलवरून मेगा प्रक्रिया

राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांना 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका…

Read More

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीमधून सांस्कृतिक मंत्र्यांना डच्चू:आशिष शेलार यांना वगळल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मात्र, या समितीमधून राज्याचे…

Read More