Headlines

Sanjay Raut Challenges Kirit Somaiya on 15.15 Lakh Crore Rajesh Exports Scam


अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल पाच कोटी रुपये चोरीला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, देशातील महत्त्वाच्या संस्था

.

यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, सरकारने आपल्या कारभाराचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.

राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना खुले पत्र लिहून कथित राजेश एक्सपोर्ट्स घोटाळ्याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. देशभरात गाजत असलेल्या या प्रकरणात तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होत असताना भाजप आणि केंद्र सरकार मौन का बाळगत आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना खुले पत्र

संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात राजेश एक्सपोर्ट्स आणि त्याचे प्रमोटर यांच्याविरोधात गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप असल्याचा उल्लेख केला आहे. महसूल फसवणूक, परदेशी उपकंपन्यांमार्फत निधी हस्तांतरण, खोट्या व्यवहारांच्या नोंदी आणि मनी लॉन्ड्रिंगसारख्या बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रात राऊत यांनी एलआयसीच्या गुंतवणुकीचाही मुद्दा उपस्थित केला आहे. कंपनीच्या शेअरमधील घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदारांसह पॉलिसीधारकांच्या पैशांवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बॅटरी उत्पादनाशी संबंधित PLI योजनेअंतर्गत कंपनीला मिळालेल्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

राऊतांकडून कठोर कारवाईची मागणी

किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातही त्यांनी तितक्याच आक्रमकपणे भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत राऊत यांनी संसदेत आणि सार्वजनिक व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच केंद्र सरकारकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.

पत्रात केंद्र सरकारवरही थेट निशाणा

राऊत यांनी पत्रात केंद्र सरकारवरही थेट निशाणा साधला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांनी या प्रकरणात मात्र मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. “भ्रष्टाचाराविरोधातील लढा हा निवडक प्रकरणांपुरता मर्यादित नसावा. सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींवर आरोप होत असतील, तर त्यांचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,” असे नमूद करत राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आघाडी घेऊन जनतेसमोर सत्य आणावे, असे आवाहन केले. तसेच संसदेत आणि विविध सार्वजनिक मंचांवर हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणीही त्यांनी केली.

संजय राऊत यांचे पत्र…

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम:म्हणाल्या- मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व शक्यतांना फेटाळून लावले. राज्यसभा उमेदवारीसंदर्भातील पडद्यामागील घडामोडींवरही त्यांनी प्रथमच भाष्य केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *