Headlines

पेपरफुटीला जबाबदारांवर कारवाई करा:भीमशक्ती संघटनेची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा‎

नीट पेपरफुटीची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली. यासाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याच अनुषंगाने दिल्लीतील पर्यावरणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या उपोषणालाही संघटनेने पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाची जबाबदारी…

Read More

दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने सांगितले की, टेलिग्रामच्या गोपनीयता आणि अनामिकता राखणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे ते गुन्हेगारांचे आवडते नेटवर्क बनले आहे. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर टेलिग्रामने दाखल केलेल्या…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

पिंपळदरी परिसरात पावसाअभावी पिके संकटात:रिमझिम पावसावर पेरण्या आटोपल्या, आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे‎

परिसरात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजाची चिंता कमालीची वाढली असून, आता संपूर्ण परिसराला दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पेरणी झालेल्या शेतांमध्ये पिकांची उगवण सुरू झाली असली, तरी पुरेशा ओलाव्याअभावी अनेक ठिकाणी कोवळी रोपे कोमेजून जाण्याची भीती निर्माण झाली…

Read More

आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात कळमनुरीचा झेंडा:डॉ. संतोष कल्याणकर यांच्या सादरीकरणाची जागतिक स्तरावर दखल

कळमनुरीच्या केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्सचे अध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर यांनी नुकताच फिनलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद व जर्मनी येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदवून कळमनुरीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. दि. १० मे ते १५ मे दरम्यान हेलसिंकी (फिनलंड) येथे क्रिएटिव्ह कौन्सिल ऑफ एज्युकेशन, फिनलंड यांच्या वतीने आयोजित “पहिली आंतरराष्ट्रीय सृजनशील शिक्षण परिषद” उत्साहात पार पडली….

Read More

40 दिवसांत 4 फुटांचे झाले बाबा बर्फानी:अमरनाथ यात्रेचा दुसरा दिवस, 23 मे रोजीच्या पहिल्या फोटोत आकार 7 फूट होता

अमरनाथमध्ये तयार होणाऱ्या पवित्र शिवलिंगाचा आकार कमी होऊन केवळ 4 फूट राहिला आहे. 23 मे रोजी BSF जवानांनी जारी केलेल्या फोटोमध्ये शिवलिंगाचा आकार तब्बल 7 फूट होता. 29 जून रोजी पहिल्या पूजेच्या दिवशीही हिमलिंगाची उंची 5 फुटांपेक्षा जास्त होती. 3 जुलै रोजी समोर आलेल्या फोटोमध्ये हिमलिंग केवळ 4 फुटांचे दिसत आहे. त्याची रुंदीही कमी झाली…

Read More

बलराज संघई यांचा कॉलम:शब्द भावनेचे वाहक अन् आधाराची सावली असतात

शब्द.. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. दोन अक्षरांच्या एकत्र येण्याने काहीतरी उलगडा व्हावा अशी निर्मिती. नुसता आवाज आला तरी तो शब्द असतो. आणि आवाजाला काही अक्षरांचं स्वरूप असलं तर मात्र एक अर्थबोध होतो. म्हणूनच शब्द दोन प्रकारचे असतात ,अक्षरात्मक आणि अनक्षरात्मक. संपूर्ण जग दोन प्रकारच्या पदार्थांनी व्याप्त आहे. जीव आणि अजीव. जीव परस्पर व्यवहारासाठी शब्दांच्या माध्यमातून भाषेचा…

Read More

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे 11,000 वृक्षरोपांची लागवड:नाशिकच्या विविध तालुक्यांसह राज्यभरातील आश्रमांत वृक्षारोपण‎

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राज्यभरातील तसेच राज्याबाहेरील विविध आश्रमांमध्ये ११,००० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्पही केला. सततच्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर “निसर्गाचे आपण देणे लागतो’ या भावनेतून पर्यावरण संरक्षणासाठी जय बाबाजी भक्त परिवारातर्फे दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते….

Read More

मस्क यांच्या नेटवर्थमध्ये आठवड्यात ₹33.13 लाख कोटींनी घट:हे जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त; स्पेसएक्सचा शेअर 16% घसरला

जगातील पहिले ट्रिलियनपती बनल्यानंतर काही दिवसांनीच एलन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत आतापर्यंतची विक्रमी घट झाली आहे. त्यांच्या रॉकेट कंपनी स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये १६% घट झाल्यामुळे मस्क यांची निव्वळ संपत्ती अवघ्या एका आठवड्यात सुमारे ३५० अब्ज डॉलर म्हणजेच ३३.१३ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीश यादीनुसार, स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर एलन मस्क यांची…

Read More

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सटाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने‎

बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) संपर्क नेते जयंत दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १०) तहसील कार्यालयावर धडक देत निदर्शने करण्यात आली. तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे….

Read More