![]()
भ्रष्टाचार व घराणेशाहीमुळेच सहकार चळवळ नासली व जनसामान्यांच्या उन्नतीचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. त्यामुळे सहकाराला प्रामाणिक संस्काराचे बळ देण्याचे काम सहकार भारती करत आहे, असे प्रतिपादन सहकार भारती अकोला जिल्हाध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी केले. अकोला अर्बन बँकेत आयोजित सहकार भारतीच्या सभेत अध्यक्षीय विचार मांडताना ते बोलत होते. यावेळी सहकार भारती जिल्हा महामंत्री जैनेंद्र लुंकड, विधी प्रकोष्ठ संयोजक रामेश्वर खोंड, जिल्हा सचिव दिपक मायी, सनदी लेखापाल तथा बँक प्रकोष्ठ संयोजक भरत व्यास, जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी, नवनियुक्त तालुका अध्यक्ष किर्तीकुमार भारुका आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात भारतमाता पूजनाने झाली. अॅड. रामेश्वर खोंड यांनी मार्गदर्शनातून सहकार भारतीच्या कार्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष फुंडकर यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किर्तीकुमार भारुका यांची अध्यक्षपदी, जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका नूतन पिंपळे यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी भारतीय ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे सचिव संतोष पाठक तसेच सदस्य म्हणून किशोर गुल्हाने, डॉ. संकेत साबू, नरसिंग चावरे, कल्पक बंदिष्टे, रवींद्र पारधी, जीवतराम धनकाणी, रागिणी किडे, चित्रा वारे आदींची घोषणा करण्यात आली. यावेळी राजाभाऊ बढे, गणेश जळमकर, अक्षय बूब, विनय वारे, प्रमोद चांडक व सहकारी भारतीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक व परिचय ज्ञानेश देशपांडे यांनी करून दिला. संचालन रागिणी किडे यांनी केले तर आभार संतोष पाठक यांनी मानले.
Source link
सहकार भारतीचे बळ देण्याचे कार्य:मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणीचे गठण