![]()
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाची अंतिम आकडेवारी शनिवारी पहाटे स्पष्ट झाली. २३ ऑक्टोबर रोजी पश्चिम विदर्भात मतदान झाले होते. सर्व मतपेट्या अमरावतीतील स्ट्रांग रूममध्ये पोहोचल्यावर मतदानाची टक्केवारी ९२.२५ वर पोहोचली. निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांच्या माहितीनुसार, ३५ हजार ८१० शिक्षक मतदारांपैकी २२ हजार ९५७ पुरुष आणि १० हजार ७७ महिला ३३ हजार ३४ शिक्षकांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीपेक्षा सव्वा सहा टक्के अधिक मतदान झाले. अमरावतीत सर्वात कमी ८९.३६ टक्के, तर वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ९५.१३ टक्के मतदान नोंदवले गेले. पुरुष मतदारांचे प्रमाण (९२.९०%) महिलांपेक्षा (९०.७९%) अधिक होते. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता लोकशाही भवनात होईल. काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे मतपेट्या अमरावतीत पोहोचायला उशीर झाला, अंतिम आकडेवारी कळायला विलंब झाला.
Source link
अमरावती शिक्षक मतदार संघात 92.25 टक्के मतदान:सर्व मतपेट्या पोहोचल्यावर अंतिम आकडेवारी जाहीर, अमरावतीमध्ये सर्वात कमी मतदान