Headlines

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंजात शोभायात्रा:अख्खी गुरुदेवनगरी दुमदुमली; 58 व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ




राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुकुंज आश्रमात प्रारंभ झाला. या निमित्ताने समाधी स्थळापासून गुरुदेवनगरपर्यंत लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी, टाळ, ढोल, डमरू, पदन्यास आणि लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. ह.भ.प. मानकर स्वामी यांच्या मार्गदर्शनात आणि अमोल बांबल यांच्या संयोजनात निघालेल्या या यात्रेत ५०० हून अधिक गुरुदेवभक्त सहभागी झाले होते. पहाटे ४ वाजता राष्ट्रसंतांच्या महासमाधीला अभिषेक करून तिर्थस्थापना व चरण पादुका पूजन करण्यात आले. शंकर महाराजांच्या हस्ते हे विधी झाले. पवित्र भजन, मंत्रघोष आणि शंखनादामुळे परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी संचालक मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई बोंडे, संस्थेचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. स्मृती भवनाच्या महाद्वारावर प्रकाश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *