![]()
अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी कार वाशिंग सेंटर आणि ॲक्वा केंद्रांवर नियंत्रण आणले जाईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी म्हटले. यंदा जिल्ह्यात ४४ टक्के कमी पाऊस झाला. १० टक्के पाणी कपात, बोअरवेल, चारा वाहतूक बंदी आधीच लागू आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. भविष्यात, प्रत्येक एकर शेतात १ मीटर लांब, रुंद आणि खोल ‘जलतारा’ (जलशोष खड्डा) तयार केला जाईल. ९४८ गावांमध्ये १,७९५ उपाययोजनांसाठी ३२ कोटी रुपये खर्च होतील. मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये भूजल पातळी ९० फूट खोल गेली आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये बोअरवेल खोदण्यावर बंदी आहे. भूगर्भातील पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. सार्वजनिक स्रोतांजवळ बोअरवेल खोदणाऱ्यांवर कारवाई होईल.
Source link
पाणी वाचवण्यासाठी कार वाशिंग, ॲक्वा सेंटरवर नियंत्रण:अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे संकेत, दुष्काळामुळे घेतला निर्णय