Headlines

निसर्ग संवर्धन:कस्तुरी ट्रस्टसह नोएल स्कूलचा वृक्ष‎लागवड महाअभियानात सहभाग‎, ‘एक वृक्ष एक जीवन’उपक्रमांतर्गत देशभर लावणार झाडे‎


.

पर्यावरण संवर्धनासाठी दैनिक दिव्य मराठी व दैनिक भास्कर माध्यम समूहाने देशभरात ‘एक वृक्ष एक जीवन’ उपक्रमांतर्गत ७५ लाख झाडे लावण्याचे महाअभियान हाती घेतले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ७ जुलै रोजी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून या अभियानांतर्गत विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि. १७) शहरातील ‘कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि नोएल स्कूलमध्ये वृक्षलागवड करण्यात आली.

या अभियानात शहरातील नोएल स्कूलने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचे अभियान राबवणारे दैनिक दिव्य मराठी व दैनिक भास्कर हा एकमेव माध्यम समूह असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी उपस्थितांनी काढले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपणावेळी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अनोष विजय मनवर, अनुल विजय मनवर, शिक्षक श्रीधर पिंपळकर, शिक्षिका सोनाली देशपांडे व अर्चना फरपट यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाने सहभाग घेत शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड केली. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी शाळेतील झाडांच्या संगोपनासह घरोघरी झाडे लावून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. याप्रसंगी अनोष विजय मनवर म्हणाले की, “जागतिक तापमानवाढीने जगासमोर नवे आव्हान निर्माण केले आहे. त्यावर झाडे लावणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक शैक्षणिक संस्थेने असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. भविष्यात हरित पर्यावरण टिकवण्यास मदत होईल. आजची पिढी निसर्गाशी जोडली गेली, तर भविष्यात निसर्गच आपल्याला वाचवेल.” कार्यक्रमात दैनिक ‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ चे कौतुक करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत आहे.

अकोला | प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दैनिक ‘दिव्य मराठी’च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ या महाअभियानांतर्गत शुक्रवारी (दि. १७) वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानांतर्गत राज्यभर ७५ लाख वृक्षलागवड तसेच अश्वगंधा बिजरोपणाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याप्रसंगी कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अॅड. किशोर बुटोले, कस्तुरी ट्रस्टचे सतीश बिटोडकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, संजय ठाकरे, दामोदर नुपे, अंबादास तल्हार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत सतीश बिटोडकर यांनी त्यांच्या स्वर्गीय पत्नी स्मिता सतीश बिटोडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टला देणगी म्हणून दिला. संस्थेच्या खुल्या टिनशेडचे सुसज्ज सभागृहात रूपांतर करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानिमित्त कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीच्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहिती देण्यात आली. कस्तुरी ट्रस्टकडून धार्मिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. यामुळे या वृक्षा रोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यादरम्यान मोठ्या संख्येने मान्यवर सहभागी होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *