Headlines

पुणे-शिरूर द्रुतगती महामार्गासह 3 मेगा प्रकल्पांचा शुभारंभ:18 जुलैला नितीन गडकरी अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार, 18 जुलै रोजी होणार आहे. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार…

Read More

राऊत सामना सोडून एकनाथ शिंदेंचे ड्रायव्हर झालेत का?:महाराष्ट्रात 'सब कुछ' देवाभाऊच, ज्यांना आयुष्य सुखकर करायचे त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे- नीतेश राणे

एकनाथ शिंदे प्रवासादरम्यान दिल्लीला काय काय घेऊन जातात, हे केवळ त्यांच्या वाहनचालकालाच माहिती असू शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील नोकरी सोडून ते शिंदेंकडे ड्रायव्हर म्हणून रुजू झाले असावेत, असा खोचक टोला भाजपचे नेते नीतेश राणे यांनी लगावला आहे. नीतेश राणे म्हणाले की, शरद पवार एनडीएबरोबर जाणार का नाही हा विषय वरीष्ठ पातळीवरील आहे….

Read More

संजय राऊत यांचा गोविंददेव गिरी महाराजांना सवाल:अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहारावर उपस्थित केले प्रश्न

नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणावरून त्यांनी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी थेट सवाल केला की, “गोविंददेव गिरी महाराज हे खजिनदार असल्याने तिजोरीचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी…

Read More

IRCTC New Website Launched | Faster Checkout & No Captcha Updates

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट IRCTC ची नवीन आवृत्ती (व्हर्जन) लॉन्च करण्यात आली आहे. या अपग्रेडचा मुख्य उद्देश दररोज तिकीट बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांचा अनुभव सोपा आणि जलद करणे हा आहे. हा मोठा बदल समजून घेण्यासाठी, या खास प्रश्नोत्तर (Q&A) अहवालात संपूर्ण बातमी वाचा… प्रश्न 1: IRCTC च्या या…

Read More

Supriya Sule Delimitation Statement Controversy; Vijay Wadettiwar Clarifies

लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. प्रत्येक राज्याच्या लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढ केल्यास त्याला आमचा आक्षेप नसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. . ‘इंडिया’ आघाडी एकत्र बसून निर्णय घेणार नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीची भूमिका स्पष्ट केली….

Read More

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यात थांबलेल्या एका ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकमधील मदतनीस (क्लिनर) जमसुद्दीन मोहम्मद गौसदेसाई (वय ४२) यांचा मृत्यू…

Read More

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच कारागृहात 2 खुन्यांचे लग्न:22 जुलै रोजी सप्तपदी, युवकाने शेजाऱ्याचा आणि युवतीने पतीचा खून केला होता

जोधपूरच्या मंडोर खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले युवक-युवती 22 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याला परवानगी दिली आहे. राजस्थानच्या न्यायिक इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखाद्या खुल्या कारागृहाच्या (खुला बंदी शिबिर) आवारात दोन दोषींचा विवाह होईल. युवक नागौरचा, तर युवती मुंबईची रहिवासी आहे. कारागृहातच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी…

Read More

'मैं वापस आऊंगा' ची सक्सेस पार्टी:बॉबी देओल, अनन्या पांडेसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले; इम्तियाज अलीचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

दिलजीत दोसांझ, वेदांग रैना आणि शरवरी वाघ अभिनीत ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाची सक्सेस पार्टी काल रात्री मुंबईत आयोजित करण्यात आली होती. चित्रपटाच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बॉबी देओल, अनन्या पांडे आणि दिया मिर्झा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार्स पार्टीत उपस्थित होते. इम्तियाज अली दिग्दर्शित या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने रिलीजच्या 33 दिवसांत 62.61 कोटी रुपयांचे…

Read More

..तर जनतेचा राजकीय नेत्यांवरील विश्वासच उडून जाईल:पवारांच्या एनडीए प्रवेशावरून मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा हवाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’त सहभागी होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आधीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर अवघ्या 15 दिवसांत जर शरद पवार एनडीएमध्ये आले, तर जनतेचा राजकीय नेत्यांवरील विश्वासच उडून जाईल, असा थेट दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे….

Read More

Raj Thackeray Supports Sonam Wangchuk; Urges PM Modi Over NEET Controversy

नीट (NEET) परीक्षेतील घोळ आणि सर्वच परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. वांगचुक यांच्या उपोषणाच . ही शांतता हे लोक स्मशान शांततेकडे नेतील.. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती…

Read More