Headlines

जायकवाडीत 30 टक्के पाणीसाठा:संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची 8 तासांत आवक‎, नाशिकसह वरच्या भागात मुसळधार पावसामुळे विसर्ग

नाशिक जिल्हा आणि जायकवाडी धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या आठ तासांमध्ये धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात एका टक्क्याची वाढ झाली असून, या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची महिनाभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दोन्ही जिल्ह्यांना महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा ८ तासांत जमा झाल्याची माहिती…

Read More

नागपूरच्या कामठीत सिलिंडरचा स्फोट:40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू तर 10 जखमी; गॅस गळतीमुळे लागली आग

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंदी परिसरात सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानतावणे कुटुंब सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलिंडरचा…

Read More

Brahminical Patriarchy Row; ABVP Demand Inquiry

वाराणसी5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक BHU मध्ये एमए इतिहास चौथ्या सत्राच्या परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नावरून वाद वाढत चालला आहे. या मुद्द्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थ्यांनी इतिहास विभागाबाहेर निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी बॅनर-पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि विद्यापीठ प्रशासनाकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. हा पेपर इतिहास विभागाच्या प्राध्यापिका सुतापा दास…

Read More

रुग्णवाहिकेला चालक नाही अन् रस्ता खराब:मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेला दुचाकीवर नेले, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; गडचिरोलीतील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी…

Read More

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा सल्ला

हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांत आज जोरदार गारपीट आणि वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे,…

Read More

मेळघाटातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी उपाय केले जाणार:महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही‎

मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत राज्य शासन सकारात्मक पावले उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपाययोजना करण्यात येऊन मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. धारणी येथील तहसील…

Read More

जॅकी श्रॉफ यांनी मोदींच्या आवाहनाचे समर्थन केले:म्हणाले- जगभरात संकट आहे, येथे लोक अजूनही आरामात खात-पीत आहेत; पेट्रोल-डिझेल वाचवा

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. जॅकी यांनी लोकांना इंधन वाचवण्याचे आणि संसाधनांचा शहाणपणाने वापर करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये आर्थिक आणि संसाधनांचे संकट सुरू आहे, तर भारतात परिस्थिती खूप चांगली आहे. जॅकी श्रॉफ यांच्या मते, जेव्हा देशात…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:कॉर्पोरेट जिहादची आरोपी निदा खानला आश्रय का दिला? मतीन पटेल- ओळख लपवून प्रसूतीचे कारण देत निवारा मागितला!

नाशिक येथील बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने संपूर्ण वादावर “दिव्य मराठी’ला दिलेल्या एका विशेष आणि रोखठोक मुलाखतीत निदा खानने ओळख लपवून आश्रय घेतल्याचा गौप्यस्फोट केला. आरोपीला आश्रय का दिला? मतीन : केवळ ‘माणुसकी’ नडली. प्रसूतीचे कारण सांगून निवारा मागितला होता. संपूर्ण घटनाक्रम…

Read More

विठ्ठल नामाचा गजर करीत दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी हिंगोलीत दाखल:ठिकठिकाणी स्वागत, ता. 23 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार

दिव्यांग संघ वाशिम यांच्या वतीने आयोजित संत सूरदास महाराज दिव्यांग वारीला वाशिम येथून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला असून विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे हिंगोली जिल्हयातील गोरेगाव येथे शनिवारी ता. 20 स्वागत करण्यात आले. या दिंडीचे यावर्षी दुसरे वर्ष असून भक्तीभावामध्ये शारीरिक व्यंग आड येत नाही हे या दिव्यांग भाविकांनी दाखवून दिले आहे….

Read More

थरूर म्हणाले- वंदे मातरम लोकांसाठी त्रासदायक:प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणे कठीण; यावर परस्पर सहमतीने उपाय काढला जावा

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सरकारी कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत वंदे मातरम वाजवणे किंवा गाणे अनिवार्य करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी याला अनावश्यक आणि लोकांसाठी त्रासदायक म्हटले. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे सोमवारी थरूर म्हणाले, ‘वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत आहे. जेव्हा ते गायले जाते, तेव्हा आपण आदराने उभे राहतो. याचे पहिले कडवे किंवा पहिले दोन…

Read More