Headlines

नाशिक कुंभमेळा:साधुग्राम भूसंपादनास 2267 कोटी, मोबदला दरनिश्चितीलाही सरकारने दिली मान्यता




नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुंभमेळ्याच्या तयारीला आता गती मिळणार आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ‘साधुग्राम’ प्रकल्पासाठी आरक्षित १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनाकरिता तब्बल २२६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने शुक्रवारी मान्यता दिली. नाशिक मनपा विकास आराखड्यानुसार साधुग्रामसाठी एकूण ३७७ एकर क्षेत्र आरक्षित आहे, ज्यापैकी ९४ एकर आधीच संपादित झाले आहे. उर्वरित क्षेत्रापैकी आता १९१.२१ एकर खासगी जमिनी थेट खरेदी करण्यासाठी जिल्हास्तरीय मोबदला दरनिश्चिती समितीने निश्चित केलेल्या दरांना सरकारने मान्यता दिली आहे. या निधीमध्ये जमीन संपादनाचा खर्च आणि कामकाजासाठी लागणारा रु. ३ कोटींचा खर्च समाविष्ट आहे. १९१ एकर परिसरात साधुग्राम प्रकल्प उभारणी कुंभमेळयासाठी देश- विदेशातून लाखो भाविक व पर्यटक नाशिक येथे येत असतात. तपोवन परिसरात १९१.२१ एकरवर साधुग्रामची उभारणी केली जाते. देश-विदेशातून येणाऱ्या लक्षावधी भाविक आणि साधू-महंतांच्या निवासासाठी ‘साधुग्राम’ हा कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू असतो. या निर्णयामुळे आता तपोवन परिसरातील या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *