Headlines

मुंबईला ड्रग्जचा विळखा:अंधेरीत घरावर छापेमारीतून 30 कोटींचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, नेस्को’ कॉन्सर्टमधील २ विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे ड्रग्जविरोधी अभियानावर सवाल




नशामुक्त महाराष्ट्राच्या दाव्यांना मुंबईतील ताज्या घटनांनी जोरदार चपराक लगावली आहे. एका बाजूला गोरेगावमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या दोन २४ वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तर दुसरीकडे पोलिसांनी अंधेरीत मोठी कारवाई करत चक्क १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीतून तब्बल ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनांमुळे मुंबई सध्या ड्रग्जच्या भयंकर विळख्यात सापडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. अंधेरीत गुजरातचा फरार आरोपी आरिफ शेख व त्याची पत्नी रसायनांच्या मदतीने ड्रग्जची निर्मिती करत असल्याचे तपासात समोर आले आहे. कॉन्सर्टमध्ये ड्रग्जची उघड विक्री व सेवन, पुन्हा शोला परवानगीही वादात प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे ‘एक्स्टसी’ (एमडीएमए) सारख्या घातक अमली पदार्थांची उघडपणे विक्री आणि सेवन सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे बळी गेल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कडक पावले न उचलता रविवारी लोअर परळमध्ये त्याच आयोजकांच्या दुसऱ्या शोला परवानगी दिली. त्यामुळे राज्याच्या ड्रग्जविरोधी अभियानासह पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘गृह मंत्रालयाने तातडीने अ‍ॅक्शन घ्यावी’ “या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगावे की तिथे नक्की काय घडले? हे जर पोलिसांच्या डोळ्यांसमोर होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे.’- सुप्रिया सुळे, खासदार आयोजक व नेस्को कर्मचाऱ्यांसह ६ जेरबंद या प्रकरणी अटकेतील कल्याणचा पुरवठादार आनंद पटेल, ड्रग्ज उपलब्ध करून देणारे २ विद्यार्थी, नेस्कोचे २ कर्मचारी व इव्हेंट मॅनेजर या सहा जणांवर ‘सदोष मनुष्यवध’ व ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *