Headlines

बावधनमध्ये 5 अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त:35 हजार चौरस फुटांवरील बांधकामे पाडली, वीजपुरवठा बंद करून प्लांट सील




बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटविरोधात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) धडक कारवाई केली. या कारवाईत पाच अनधिकृत आरएमसी प्लांटमधील सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच, या पाचही प्लांटचा वीजपुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कायमस्वरूपी बंद करून घेण्यात आला. आकाशचिन्ह विभागाने प्लांटच्या ऑपरेटिंग रूम सील केल्याने संबंधित प्लांट बंद करण्यात आले आहेत. बावधन बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक २२१, २२३, २२४ आणि २२५ पार्ट या परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या आरएमसी प्लांटवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये द मार्क इन्फ्रा (सर्व्हे क्रमांक २२३), केईसी इंटरनॅशनल लिमिटेड (सर्व्हे क्रमांक २२१/२, २२१/३, २२४/२, २२४/५), डीएनव्ही इन्फ्राकॉन एलएलपी (सर्व्हे क्रमांक २२५/२), यशाई इन्फ्रा आणि अल्ट्राटेक आरएमसी (दोन्ही सर्व्हे क्रमांक २२१/१) या पाच आस्थापनांचा समावेश आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या समन्वयाने ही कारवाई केली. कारवाईसाठी नऊ जेसीबी, दोन गॅस कटर, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ६० जवान, १५ पोलीस कर्मचारी, पाच अतिक्रमण निरीक्षक आणि ४० बिगारी सेवकांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कारवाईदरम्यान उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांनी मार्गदर्शन केले. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे आणि शाखा अभियंता अजय फाले यांनी कारवाईचे नियोजन केले. संबंधित विभागांच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई पूर्ण केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *