Headlines

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला:औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी कलाग्राम येथील सुरक्षा व सुविधांची पाहणी करून दिल्या सूचना




छत्रपती संभाजीनगर येथे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी केंद्र उभारले आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज चिकलठाणा येथील कलाग्रामसमोरील केंद्राची पाहणी करून सुरक्षा व सुविधांचा आढावा घेतला. श्रीकांत यांनी सीसीटीव्ही, मतपेट्या ठेवण्याची जागा, मतमोजणी कक्ष, वीजपुरवठा, पर्यायी वीज व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका तपासल्या. वीजपुरवठ्यामुळे मतमोजणीत अडचण येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मतमोजणीच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींना अडचण येऊ नये. यासाठी प्रवेश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व इतर मूलभूत सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. सर्व यंत्रणांनी एकत्र काम करून केंद्रावरील व्यवस्था तयार ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., महानगरपालिका आयुक्त अमोल ऐडगे आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *