Headlines

स्मार्ट मीटरचा 40 हजार कोटींचा बोजा ग्राहकांवर: समितीचा आरोप:नागपुरात उद्या महावितरण कार्यालयावर विशाल मोर्चा

राज्यात लागू होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेचा 40 हजार कोटींचा खर्च सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जाईल, असा आरोप नागरी संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 16 हजार कोटी रुपयांचा थेट भार जनतेवर पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सक्तीविरोधात उद्या, गुरुवारी (25) नागपुरात महावितरणच्या कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात…

Read More

हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांनंतर जिल्हा प्रशासन सतर्क:रुडकीच्या केंद्रीय संशोधन संस्थेकडून घेणार तांत्रिक मार्गदर्शन

हिंगोली जिल्हयात भूकंपरोधक बांधकाम, इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता तसेच आपत्तीपूर्व तयारीसाठी उत्तराखंडमधील रुडकी येथील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेच्या संचालकांसमवेत बैठक आयोजित करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तर भूकंपकेंद्राच्या परिसरातील गावांतील शासकिय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडे सातत्याने जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप तसेच…

Read More

644 पैकी 198 कर्मचारी संपावर:‘काम नाही, वेतन नाही’ सरकारचे धोरण लागू, सुधारित पेन्शन योजनेसाठी आग्रह; आराेग्य, जि.प.सह अन्य कर्मचाऱ्यांची पाठ‎

सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजाणी, रिक्त पदे, निवृत्तीचे वय वाढवणे यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. संपाची हाक सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिली आहे. संपात महसूल, पुरवठा, सहाय्यक दुय्यम निबंध, विभागाचे १९८ कर्मचारी सहभागी झाले. हा संप दीर्घकाळ सुरु राहिल्यास व अन्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाल्यास थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन शासकीय…

Read More

"पुस्तकांचे गाव' ज्ञानकेंद्र म्हणून विकसित व्हावे- जिल्हाधिकारी

वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते….

Read More

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभागाच्या शासन…

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंच्या अपघातावर संशय:कंटेनर चालक जमाल वारिसने जबाबात दिली महत्त्वाची माहिती

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. शेळके यांच्या कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जबरदस्त धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली घुसली. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू…

Read More

छत्रपती संभाजीनगरात FDA चा दणका:तब्बल 2.93 कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त; 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

‘सेफ फूड-सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी धडक कारवाई केली आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, या ठिकाणाहून तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांचा संशयित निकृष्ट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे खळबळ उडाली आहे. नेमकी कारवाई कुठे…

Read More

शिवरायांच्या मूळ गावचा राज्याभिषेक सोहळा:वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर आज शनिवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह आमदार-खासदार आणि शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा सोहळा अखंडपणे साजरा झाला. सकाळी आठ वाजता 51…

Read More

भगवान परशुरामांच्या विचारांचा वारसा जपावा:आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत केले अभिवादन

‘भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे. भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. त्यानिमित्त येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत त्यांच्यासह विधान परिषद सदस्य संजय…

Read More