Headlines

नाविन्यपूर्ण कला असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव द्यायला हवा- डॉ. अशोक रुपनर:दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेत 50 शिक्षकांचा सहभाग‎




मुलांना प्रात्यक्षिक करायचे असतात परंतु हव्या तेवढ्या सुविधा नसतात. शाळेमध्ये घ्यायचे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. रोजच्या वेळापत्रकामधून वेळ भेटत नाही तर सुट्टीच्या दिवशी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना सायन्स सेंटरमध्ये घेऊन जायला हवे, प्रात्यक्षिक दाखवायला हवेत. सर्वच मुले नाविन्यपूर्ण नसतात, परंतु ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण कला आहे त्यांना वाव द्यायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अशोक रुपनर यांनी व्यक्त केले. उर्मी फाउंडेशन, पुणेसह मोहोळ विज्ञान व गणित मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६, ७ जुलै रोजी लोकसेवा हॉटेल मोहोळ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेच्या मार्गदर्शन प्रसंगी विज्ञान व गणित विषयाचे ५० शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासह विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन अधिक प्रभावी, प्रयोगाधारित आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी करण्यात आले होते. विज्ञान की जिज्ञासा या दोन दिवसीय विज्ञान व गणित शिक्षक क्षमता विकास कार्यशाळेचा आज उत्साहात समारोप झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *