Headlines

'माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…':ओक्साबोक्शी रडत 'सैराट' फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट केला भावनिक व्हिडिओ

‘सैराट’ चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र ‘सल्या’ (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे. अरबाजने आज (९ जुलै) पहाटे ४ वाजताच्या सुमारास आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावूक व्हिडिओ पोस्ट करत वडिलांच्या उपचारासाठी मदतीची आर्त हाक दिली. “मला माझ्या बापाला मरू द्यायचं नाहीये, प्लीज मदत करा,”…

Read More

बाटली, कॅनमध्ये इंधन विक्री बंद; कजगाव पेट्रोल पंपांवर शुकशुकाट:काळ्याबाजाराची चौकशी करण्याची वाहनधारकांची मागणी‎

कजगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बाटली, कॅन तसेच इतर कोणत्याही खुल्या भांड्यात पेट्रोल व डिझेल देण्यास प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या आदेशानंतर कजगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असून तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे सामान्य वाहनधारकांना काही प्रमाणात…

Read More

पुण्यातील उद्योजक केपीआयटीचे संस्थापक डॉ. रवी पंडित यांचे निधन:उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि ‘के अँड पी’ समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. ऊर्फ रवी पंडित यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा चिन्मय, मुलगी प्राची आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा…

Read More

संग्रामबापूंनी केलेली शाईफेक अगदी योग्यच:ही शाईफेक नसून दुखावलेल्या भावनांचा उद्रेक, धर्माविरोधात बोलायला यांना कोण प्रवृत्त करते?-संग्राम जगताप

ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे,…

Read More

धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू:मित्रांच्या जबाबातून उलगडणार सत्य, दौलताबादजवळील नंदीबेड धबधबा परिसरातील प्रकार

दौलताबाद येथील नंदीबेड धबधबा परिसरात मृतदेह आढळला. पोलिसांच्या पथकाने स्ट्रेचरवरून मृतदेह आणला. “मित्रांसोबत धबधब्यावर जाऊ नकोस,’ असा वडिलांनी काळजीपोटी दिलेला हा सल्ला न ऐकणे शहरातील रमानगर येथील एका १८ वर्षांच्या तरुणाच्या जिवावर बेतले. रविवारी (५ जुलै) सुटीच्या दिवशी मित्रांसोबत दौलताबाद परिसरातील केसापुरी तांडा येथील नंदीबेड धबधबा पाहण्यासा . प्रथमेश हा बारावीत शिकत होता. त्याचे वडील…

Read More

कुंभकर्ण केवळ झोपत नव्हता, तो एक वैज्ञानिक होता- आनंदीबेन पटेल:प्रयागराजमध्ये म्हणाल्या- मुलांच्या यशामागे मातांचा खूप मोठा त्याग

प्रयागराजमध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल म्हणाल्या की, मुलांच्या यशामागे मातांचा त्याग, समर्पण आणि अथक परिश्रम दडलेला असतो. अनेक माता आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी वैयक्तिक इच्छा आणि करिअरचाही त्याग करतात. मूल झाल्यावर माता आपली नोकरी सोडतात, कारण त्यांना मुलांचे भविष्य सांभाळावे लागते. त्या म्हणाल्या की, एक आई सकाळी 4 वाजता सर्वात आधी उठते आणि रात्री सर्वात शेवटी…

Read More

विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालना:माजी विद्यार्थी गजानन हरणे

प्रतिनिधी | अकोला “चला पुन्हा एकदा जगूया, बालपणाचे ते सोनेरी दिवस!’ या भावनिक हाकेला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कावसा येथे माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध पुन्हा दृढ केले. माजी विद्यार्थी गजानन हरणे म्हणाले की, या माजी विद्यार्थी…

Read More

​'भंडारा-गोंदिया'त अखेरच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा:काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात, नाना पटोलेंचा 'डबल गेम' की अंतर्गत धुसफूस?​

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या अंतिम दिवशी भंडारा-गोंदिया मतदारसंघात अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच, महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसने राजकीय पंडितांना चक्रावून टाकणारी खेळी खेळली आहे. काँग्रेसकडून अर्जुनी/मोरगावचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांचा…

Read More

'लोकराज्य' मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो उलटा:विधानसभेत गदारोळ, 24 तासांत कारवाईची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या अधिकृत ‘लोकराज्य’ मासिकात एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या मासिकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि त्यांना मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा फोटो चक्क उलटा छापण्यात आला आहे. या चुकीचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत उमटले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला…

Read More

पंजाबमध्ये मेहुण्याला जिवंत जाळले, व्हिडिओ समोर आला:मध्यस्थी करायला आलेली वहिनी देखील जळून मरण पावली; पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला होता

तरनतारनमध्ये आपल्या पत्नीला माहेरून सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पतीला त्याच्याच मेहुण्याने पेट्रोल टाकून आग लावली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेली वहिनीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, त्यामुळे तिचाही जीव गेला. इतकंच नाही, तर या दोघांना आगीच्या हवाली करणारा मेहुणाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्यामुळे तोही गंभीररित्या भाजला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला वाचवले. ही घटना…

Read More