Headlines

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती….

Read More

महात्मा फुले चित्ररथाचे नेरपिंगळाईत भव्य स्वागत:अखिल भारतीय समता परिषदेचा समाजप्रबोधनाचा उपक्रम

नेरपिंगळाई येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विशेष चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी या चित्ररथाचे उत्साहात स्वागत केले. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ…

Read More

माझे लग्न का लावून देत नाही?:मुलाने जाब विचारत आईला जिवंत जाळले, आरोपीला अटक; धुळ्यातील धक्कादायक घटना

ग्रामीण भागात तरुणांची लग्ने न जमण्याची समस्या किती भीषण स्वरूप धारण करत आहे, याचे एक सुन्न करणारे वास्तव धुळे तालुक्यातून समोर आले आहे. लग्न लावून देत नसल्याच्या संशयातून एका ४५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईला अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या भीषण घटनेत गंभीर भाजलेल्या जिजाबाई भटू खैरनार-पाटील यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी…

Read More

‘रामायण: पार्ट वन’ ची प्रदर्शनाची तारीख बदलू शकते:दावा – चित्रपट दिवाळी 2026 च्या एक आठवडा आधी 30 ऑक्टोबर रोजी येऊ शकतो

रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण: पार्ट वन’ हा चित्रपट दिवाळी 2026 (8 नोव्हेंबर) च्या एक आठवडा आधी प्रदर्शित होऊ शकतो. खरं तर, बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ‘रामायण: पार्ट वन’ आता 30 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होऊ शकतो. यापूर्वी तो दिवाळी 2026 ला प्रदर्शित करण्याची योजना होती. रिपोर्टनुसार, निर्मात्यांना हा चित्रपट दिवाळीच्या…

Read More

महावितरणच्या शिरपेचात मानाचा तुरा!:संचालक राजेंद्र पवार यांना ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार, जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदेत सन्मान

जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लोबल एनर्जी ॲण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘जीईईएफ’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६’…

Read More

साताऱ्यातून चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’:17 जणांवर पोलिसांची कारवाई; बोगस कॉल सेंटर उध्वस्त

अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात रोख रक्कम, लॅपटॉप,…

Read More

पुणे काँग्रेसला पूर्व-पश्चिम असे दोन शहराध्यक्ष:डॉ. विश्वजित कदम म्हणाले – 'संघटन सृजन'मुळे पक्षाला नवी उभारी मिळेल.

काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत पुणे शहरासाठी प्रथमच पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नियुक्त केले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी सांगितले की, हे नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील. पुणे शहर पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची, तर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर आणि माजी…

Read More

पुणे महापालिकेची ‘पेस एज्युकेशन ट्रस्ट’वर कारवाई:10 वर्षांसाठी काळ्या यादीत, 10 लाखांची ठेव जप्त; अटी व शर्थी उल्लंघनाचा ठपका

पुणे महानगरपालिकेने (मनपा) ‘मे. पेस एज्युकेशन ट्रस्ट’वर मोठी कारवाई केली आहे. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संचालनासंदर्भात करारातील अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाने या संस्थेला पुढील १० वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, संस्थेकडे जमा असलेली १० लाख रुपयांची सुरक्षा ठेवही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे मनपाच्या माध्यमिक व…

Read More

अक्कलकोटवरून परतताना भाविकांवर काळाचा घाला:वर्ध्याजवळ कारची उभ्या ट्रकला धडक; दोन महिलांचा मृत्यू, 8 जण गंभीर

पंढरपूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन आटोपून अत्यंत आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. तुळजापूर-नागपूर महामार्गावरील सालोड-नागठाणा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (२३ मे) पहाटेच्या सुमारास झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात नागपूरच्या दोन महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ६ वर्षांच्या चिमुरड्या पाहुण्यासह एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रभर ड्रायव्हिंग…

Read More

'ई-चलन' कारवाईतून मुक्त करा, अन्यथा आंदोलन:पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभेतून सरकारला इशारा

पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी ‘इ-चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. शासनाने यावर तोडगा न काढल्यास राज्यात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ही मागणी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ-चलन’ कारवाईविरोधात वाहतूकदारांनी यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान आणि पुण्यातील आरटीओ कार्यालयावर आंदोलने केली आहेत. तरीही…

Read More