Headlines

ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा:अध्यक्ष संतोष वाघमारे; सरचिटणीसपदी निशिकांत देशमुख, निलेश रामगावकर

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ही निवड प्रक्रिया धामणगाव रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. संतोष वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून, निशिकांत देशमुख आणि निलेश रामगावकर सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळतील. नूतन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी योगेश ठाकरे (वरुड)…

Read More

भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास इर्विन चौकात अनुभवता येणार

पुण्यातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली, त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. हा ‘भिडेवाडा चित्ररथ’ बुधवार, २० मे रोजी अमरावतीत दाखल होणार असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची माहिती नागरिकांना मिळणार आहे….

Read More

'कसं काय?' आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा संदेश पोहोचवते

राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या गीताचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकविल्या जाणाऱ्या या गीताच्या माध्यमातून निरोगी…

Read More

ओबीसींसाठी मोठी बातमी!:'नॉन क्रिमीलेअर'ची मर्यादा 8 वरून 15 लाख करण्याची शिफारस, 43 नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे प्रस्ताव

राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उपसमितीच्या बैठकीत, ओबीसींसाठी असलेली ‘नॉन क्रिमीलेअर’ उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख रुपये करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावावर पुढील कार्यवाहीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. यासोबतच, ओबीसी प्रवर्गात आणखी 43…

Read More

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी स्थायी समितीच्या अध्यक्ष:विज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे. राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी…

Read More

Pune Hosts Parambh 2026 for International Tax System Reforms

आयकर विभागाने पुण्यात ‘प्रारंभ २०२६’ अंतर्गत एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्सफर प्रायसिंगमधील बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्याचा उद्देश विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे आणि करप्रणाल . पुणे येथील ‘बोधी टॉवर’ आयकर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मुख्य आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय करप्रणाली व ट्रान्सफर प्रायसिंग) मोहित जैन यांच्या…

Read More

NEET पेपरफुटीचा लातूर पॅटर्नला मोठा फटका!:RCC च्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, पालकांवरही ओढवले आर्थिक संकट

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसमोर नव्याने तयारी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळाचा आणि अनिश्चिततेचा सर्वाधिक मानसिक तसेच शैक्षणिक फटका लातूरमधील ‘आरसीसी’ कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसला आहे. गेल्या…

Read More

पुणे विभागात मान्सूनपूर्व तयारी; यंत्रणा सज्ज:प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी घेतला आढावा

पुणे विभागात आगामी मान्सून आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मान्सून काळात अतिवृष्टीमुळे पाणी…

Read More

लष्करप्रमुख जनरल द्विवेदी एनडीएच्या दीक्षान्त संचलनाची पाहणी करणार:खडकवासला येथे 150 व्या कोर्सचा ऐतिहासिक सोहळा; 355 कॅडेट्स बाहेर पडणार

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या १५० व्या कोर्सचा दीक्षान्त संचलन सोहळा शनिवार, ३० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून संचलनाची पाहणी करतील. हा दिमाखदार सोहळा खडकवासला येथील ‘खेत्रपाल परेड ग्राऊंड’वर पार पडेल. यावर्षीच्या वसंत सत्रात भूदल, नौदल आणि…

Read More

हिंगोलीत बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई:जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोलपंप चालकांना कडक आदेश, परवापासून होणार अंमलबजावणी

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून गुरुवारपासून ता. २१ या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. इंधनाचा अनधिकृत साठा होऊ नये आणि संभाव्य धोके टाळता यावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून…

Read More