आयकर विभागाने पुण्यात ‘प्रारंभ २०२६’ अंतर्गत एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्सफर प्रायसिंगमधील बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्याचा उद्देश विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे आणि करप्रणाल
.
पुणे येथील ‘बोधी टॉवर’ आयकर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मुख्य आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय करप्रणाली व ट्रान्सफर प्रायसिंग) मोहित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सनदी लेखापाल, कर व्यावसायिक, विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘आयकर अधिनियम, २०२५’ आणि ‘आयकर नियम, २०२६’ अंतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सत्रादरम्यान आंतरराष्ट्रीय करप्रणालीतील सुधारणा, तरतुदींचे सुलभीकरण, विविध प्रपत्रांचे एकत्रीकरण आणि अनुपालन सुलभ करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे म्हणाले की, “नवीन आयकर अधिनियम २०२५ हा कर कायदे अधिक सुलभ करण्यासाठी आणि सीमापार व्यवहार करणाऱ्या करदात्यांना स्पष्टता प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाधारित बदलांमुळे प्रशासकीय पारदर्शकता वाढणार असून करदात्यांवरील ओझे कमी होईल.”
कार्यक्रमात आयकर विभागाच्या संकेतस्थळावरील ‘कर साथी’ या एआय-आधारित चॅटबॉटचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे साधन करदात्यांच्या शंकांचे त्वरित निरसन करण्यास मदत करणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या संवादात्मक सत्रात उपस्थितांच्या शंकांचे विभागीय अधिकाऱ्यांनी निरसन केले.
नवीन नियमांमुळे जागतिक स्तरावर व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
