![]()
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे. राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. या समितीकडे विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित धोरणे, विधेयके व विविध विषयांचा अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. डॉ. कुलकर्णी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून, त्या पुण्याच्या माजी आमदार आहेत. संसदेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल डॉ. कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक चर्चेत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील वेगाने होणारी प्रगती तसेच पर्यावरण संवर्धनावर काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.” मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक तसेच जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरावर आवश्यक समन्वय ठेवणे, पात्र मतदारांची नोंदणी वाढविणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच व्यापक प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Source link
राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी स्थायी समितीच्या अध्यक्ष:विज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी