Headlines

Pandit Hariprasad Chaurasias Bansuri Journey: Mud to Melodies


भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जाऊ लागले, तेव्हा केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षी आणि वृक्षवेलीही व्याकुळ झाल्या होत्या. याच वेळी बांबूचे एक खोड कृष्णाच्या चरणी येऊन म्हणाले, “प्रभू, तुमच्या पश्चात लोक आम्हाला केवळ जळण म्हणून जाळून टाकतील.” तेव

.

याच वैशिष्ट्यपूर्ण बांबूपासून तयार होणाऱ्या बासरीचा जो मधुर आणि दिव्य स्वर कधीकाळी भगवान श्रीकृष्णाच्या सुरावटींतून उमटत असे, तोच वारसा अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या साधनेतून आजही जिवंत ठेवला आहे. विशेषतः पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या अफाट कौशल्याने या बासरीला जागतिक व्यासपीठावर नेऊन एका नव्या उंचीवर प्रस्थापित केले आहे.

पंडित हरिप्रसाद चौरसिया हे केवळ एक बासरी वादक नसून, भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून देणारे महान कलाकार आहेत. बासरीसारख्या एका साध्या, लोकवाद्याला शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय त्यांना जाते.

आजच्या रागदरबारच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या जीवनासह सांगीतिक प्रवासाविषयी..

वडिलांच्या इच्छेविरोधात..

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म 1 जुलै 1938 साली अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या कुटुंबात संगीताचा वारसा नव्हता. त्यांचे वडील पैलवान होते आणि त्यांची हीच इच्छा होती की आपल्या मुलाने सुद्धा पैलवान बनावे. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया हे लहान असतानापासूनच कुस्तीच्या तालमीला जायचे. पहाटे लवकर उठून ते वडिलांच्या तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत होते. मात्र, हे करत असतानाच त्यांचे मन संगीतात अधिक रमत होते. त्यांना बासरीने भुरळ घातली होती.

हरिप्रसाद त्यांच्या वडिलांविषयी आणि आपल्या संगीताच्या आवडीविषयी सांगतात की, “मी माझ्या वडिलांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचो. आपल्या मनाला कसे बसे तयार करून पहाटे उठायचो. झोपायची खूप इच्छा असायची, पण उशिरापर्यंत झोपलो तर वडिलांचा मार बसायचा. त्यामुळे मार बसण्याच्या आधी उठावे लागायचे. एकतर त्यांचा हात म्हणजे पैलवानाचा हात, एकदा पडला की पूर्ण जग दिसून जाईल (अर्थात दिवसा तारे दिसतील) .”

आखाड्यात जायचो पण सगळे लक्ष संगीतावर असायचे..

पुढे हरिप्रसाद सांगतात, “तेव्हा मला फार राग यायचा, हे काय मातीत कोणी कोणाला पाडत आहे, कोणी कोणाला उचलून पटकत आहे. हे मला नव्हते आवडत. तरी मी तिथे जायचो, पण माझे लक्ष सगळे राग आणि संगीतावर असायचे. आखाड्यात कुस्ती खेळून झाल्यावर गंगेत डुबकी मारून पलीकडच्या तीरावर पोहोत जायचो. यामुळे अंगाला लागेलेली माती धुतली पण जायची आणि पलीकडे जाऊन मी शांतपणे व एकाग्रपणे बासरी वाजवत बसायचो.”

पंडित भोलानाथ यांनी दिलेली बासरी अजूनही सोबत

हरिप्रसाद किशोरवयीन असताना, वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांनी गुपचूप हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हरिप्रसाद सांगतात, “एक दिवस लहान असताना मी आकाशवाणीवर बासरीची धून ऐकली. आणि जेव्हा मी आकाशवाणीला पोहोचलो तेव्हा पाहिले की पंडित भोलानाथ लाईव्ह पेरफॉर्म करत होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि म्हटले की मला तुमचा शिष्य बनवा. तेव्हा त्यांनी त्यांची एक बासरी माझ्या हातात दिली आणि आजाही ती बासरी मी माझ्यासोबत अजूनही घेऊन फिरतो.”

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या मित्राने सांगितलेला किस्सा

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या मित्राने एक किस्सा सांगितला, ते म्हणाले, “एके दिवशी हरिप्रसादने एका मुलाची बासरी घेतली आणि वाजवायला लागले. तेव्हा तर हरिप्रसाद यांनी बासरीचे प्रशिक्षणही घेतलेले नव्हते. परंतु, त्यावेळी त्यांनी जी काही धून वाजवली ती अनेकांच्या मनात घर करून गेली. हरिप्रसाद यांनी जेव्हा ती बासरी वाजवली तेव्हा माघ महिन्याची जत्रा होती. तेव्हा प्रसिद्ध संगीतकार पंडित राजाराम तिथे उपस्थित होते. जेव्हा त्यांनी हरिप्रसाद यांची बासरी ऐकली तेव्हा ते अचंबित झाले आणि त्यांनी ठरवले की आपण हरिप्रसादला बासरी शिकवणार.” इथूनच हरिप्रसाद यांचा संगीताचा प्रवास सुरू झाला असे म्हणता येईल. पंडित राजाराम यांनी हरिप्रसाद यांना बासरी शिकवली.

अन्नपूर्णा देवींकडून शिकण्यासाठी वेगळी अट

जेव्हा पंडित राजाराम यांनी हरिप्रसाद यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, तेव्हा तो 13-14 वर्षांचे होते. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. त्यांच्या बासरीचा आवाज दूरदूरपर्यंत पोहोचू लागला आणि लोक त्यांच्या सुरांकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले. याच काळात, हरिप्रसाद यांनी प्रख्यात संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्या तयार झाल्या, पण त्यांनी एक अट घातली की हरिप्रसाद यांनी आपली बासरी उजवीकडून न वाजवता डावीकडून वाजवावी. याच काळात, हरिप्रसाद यांनी पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडूनही बासरीचे प्रशिक्षण घेतले.

आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर, हरिप्रसाद यांना ऑल इंडिया रेडिओ, प्रयागराज येथे कार्यक्रम मिळू लागले. त्यांनी 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बासरी वादनात प्रावीण्य मिळवल्यानंतर, लोक त्यांना आदराने ‘पंडित’ म्हणू लागले.

बॉलीवूड चित्रपटांना संगीत

ऑल इंडिया रेडिओमधील नोकरीने पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या सर्वोत्तम दिवसांची सुरुवात झाली. तिथूनच ते मुंबईला आले. त्यांनी प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा यांच्यासोबत काम करत चांदनी, डर, लम्हा आणि सिलसिला यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिले.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना मिळालेले सन्मान

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना 1984 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1992 मध्ये पद्मभूषण आणि कोणार्क सन्मान, आणि 2000 मध्ये पद्मविभूषण आणि हाफिज अली खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना फ्रेंच सरकारकडून ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ हा सन्मान आणि ब्रिटिश राजघराण्याकडूनही गौरव प्राप्त झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *