Headlines

कन्नडला शिधापत्रिकांचे वाटप‎:प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे



प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी शनिवारी कन्नड तहसील कार्यालयात केले. तालुक्यातील आदिवासी,अंध व्यक्ती, अनाथ मुलांना राज्य अन्न आयोगाचे अध

.

यावेळी ५५ नागरिकांना अंत्योदय शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी बागुल, तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड, नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, सागर फुके आदींसह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिका मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला तसेच त्यांनी अन्न आयोगाच अध्यक्ष आणि तालुका पुरवठा विभागाचे आभार मानले. महेश ढवळे यांनी तहसीलदार सारिका भगत तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांचे अभिनंदन केले. आभार नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एकही लाभार्थी वंचित राहणार नाही प्रास्ताविक करताना तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड म्हणाले की, एकही लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन बांधिल आहे. मात्र लाभार्थ्यांनी अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *