Headlines

957 पैकी 475 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे:सटाणा महाविद्यालय व सीआयआय मॉडेल करिअर सेंटरचा उपक्रम‎




मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय व सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या वतीने आयोजित नोकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास जिल्हाभरातील ९५७ उमेदवार उपस्थित होते, त्यातील ४७५ उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. शनिवारी ( दि. २५) आयोजित मेळाव्यात अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. गुणवत्ता, कौशल्य आणि पात्रतेच्या आधारे उमेदवारांची निवड केली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. निवड झालेल्या उमेदवारांना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती विश्वास मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. अध्यक्षस्थानी चिटणीस दिलीप दळवी होते. सूत्रसंचालन प्रा. अमित निकम यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी मानले. संस्थेच्या ११२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून संस्था प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळावा घेण्याच्या विचारात आहे. पुढील २ वर्षांत २५ हजार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले. २ वर्षात २५ हजार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *