- Marathi News
- National
- The Challenge Before Us Is To Save Punjab, We Are Also Keeping An Eye On The MLAs, Punjab CM Asks The President For Time
चंदीगड/नवी दिल्ली48 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

हरभजनच्या घराबाहेर लिहिले ‘गद्दार’
आपले सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये गेल्यानंतर आपचे नेतृत्व नव्या रणनीतीवर मंथन करत आहे. रात्री उशिरा गुजरातहून परतलेले मनीष सिसोदिया विमानतळावरून थेट राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत या फुटीचा संभाव्य परिणाम नियंत्रित करण्यावर चर्चा झाली.
सूत्रांनुसार, आपसमोर सर्वात मोठे आव्हान पंजाबमध्ये पक्ष फुटण्याची शक्यता रोखणे हे आहे. राघव चड्ढा आणि संदीप पाठक हे दोघेही पंजाबच्या मागील निवडणुकीत बरेच सक्रिय होते. ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत आपचे ९४ आमदार आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सुमारे ६३ आमदार चड्ढा यांच्या संपर्कात आहेत. पक्षाने पंजाबसोबतच लोकसभा खासदार आणि दिल्लीतील आमदारांवरही पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे.
चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी शुक्रवारी आप सोडून भाजपमध्ये विलीनीकरणाची घोषणा केली होती. यापैकी सहा पंजाबचे आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे. सूत्रांनुसार, मान आमदारांसह राष्ट्रपतींची भेट घेऊन या सहा खासदारांना रिकॉल करण्याची मागणी करतील. पक्ष राज्यसभेच्या सभापतींनाही पत्र पाठवणार आहे.
मुख्य प्रतोद एन.डी. गुप्ता यात चड्ढा, पाठक आणि अशोक मित्तल यांच्याविरोधात पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करतील. हे तिन्ही नेते सार्वजनिकरीत्या भाजपमध्ये गेले आहेत. सध्या त्यांचीच तक्रार केली जाईल. आप नेते संजय सिंह यांनीही सभापतींना पत्र पाठवून संविधानाच्या दहाव्या अनुसूचीअंतर्गत तिघांना अपात्र ठरवण्याच्या मागणीबाबत सांगितले आहे.
मात्र, कायद्याच्या जाणकारांनुसार दोन तृतीयांशहून अधिक सदस्यांचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण झाल्यास पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. याच दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी शनिवारी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केली. राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंग साहनी म्हणाले की, ते पंजाबच्या भल्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत. चड्ढा यांनी यांच्या व्यतिरिक्त, हरभजन सिंग आणि राजिंदर गुप्ता हे देखील भाजपमध्ये सामील झाल्याचे सांगितले होते.
भाजपमध्ये सामील होताच चड्ढांचे १२ लाख फॉलोअर्स घटले
आप सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढा यांच्या लोकप्रियतेला धक्का बसला. २४ तासांत इन्स्टाग्रामवर १२ लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले. जे घटून १.३३ कोटी राहिले आहेत.
भाजपचा आरोप- केजरीवाल यांचा नवा बंगला शीशमहाल-२; आप म्हणाली- छायाचित्रे बनावट
दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांनी लोधी इस्टेटमध्ये केजरीवाल यांच्या नव्या बंगल्याला शीशमहाल-२ असे संबोधले. ते म्हणाले की, इथे सुविधांसाठी खासगी पैसा लागला. त्यांनी पत्रकार परिषदेत छायाचित्रे दाखवत म्हटले की ही सामान्य माणसाची नाही, तर उच्चभ्रू व्यक्तीची पसंती आहे. आपने हे दावे खोटे ठरवले. पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर म्हणाल्या की, भाजपने जारी केलेली छायाचित्रे पूर्णपणे बनावट आहेत. ती इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली आहेत. भाजप खोटेपणा आणि घोटाळ्यांच्या आधारावर चालत आहे.
भाजपला पंजाबमध्ये मुसंडीची आशा, शहरी भागात चड्ढा होऊ शकतात सक्रिय
आपमधील फुटीमुळे भाजपला पंजाबमध्ये मोठ्या बूस्टची आशा आहे. संदीप पाठक आपचे संघटन महासचिव राहिले आहेत. २०२१ च्या पंजाब निवडणुकीत तिकीट वाटपात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी चड्ढा यांच्यासोबत मिळून तिकिटे वाटली होती. बहुतांश आमदारांशी त्यांचा थेट संपर्क आहे. सूत्रांनुसार, भाजप चड्ढा आणि पाठक यांच्या प्रभावाचा वापर राज्यात आपला कमकुवत करण्याच्या रणनीतीसाठी करू शकते. विधानसभा निवडणुकीला एका वर्षापेक्षाही कमी वेळ उरला आहे. निवडणुकीपूर्वी आपच्या विद्यमान आमदारांमध्ये असंतोष किंवा फुटीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राज्य सरकारवर सध्या कोणताही धोका दिसत नाही. भाजपचे लक्ष पंजाबमध्ये जनाधार वाढवण्यावर आहे. सध्या तिथे केवळ २ आमदार आहेत. भविष्यात रणनीतीचा भाग म्हणून राघव चड्ढा शहरी आणि रवनीत बिट्टू ग्रामीण भागात सक्रिय केले जाऊ शकतात.