Headlines

Rebellion in AIADMK; 30 MLAs in support of Vijay, floor test of Vijay government today


  • Marathi News
  • National
  • Rebellion In AIADMK; 30 MLAs In Support Of Vijay, Floor Test Of Vijay Government Today

चेन्नई7 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची बहुमत चाचणी आहे. याच्या एक दिवस आधी मंगळवारी अण्णाद्रमुक मध्ये मोठी फूट पडली. पक्षाच्या सुमारे ३० आमदारांनी विजय सरकारला पाठिंबा जाहीर केला. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे नेते एसपी वेलुमणी आणि सीव्ही षण्मुगम म्हणाले, ‘एआयएडीएमके प्रमुख के पलानीसामी डीएमकेसोबत सरकार बनवू इच्छित होते. बहुतांश आमदारांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि टीव्हीकेला पाठिंबा दिला.’

दुसरीकडे, ईपीएस गटाने हे आरोप फेटाळून लावले. माजी मंत्री ओएस मणियन म्हणाले, ‘सर्व ४७ आमदार ईपीएस यांच्यासोबत आहेत.’ पक्षाने सर्व आमदारांना टीव्हीके सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप जारी केला आहे. दरम्यान, डीएमकेनेही एआयएडीएमकेच्या बंडखोर नेत्यांचे आरोप फेटाळले. पक्षाचे संघटन सचिव आरएस भारती यांनी सांगितले की, डीएमकेने पूर्वीच स्पष्ट केले होते की ते विरोधी पक्षात बसतील. त्यांनी षण्मुगम यांना ‘सत्तेचे भुकेले’ म्हटले.

आर श्रीनिवास सेतुपती यांनी फ्लोअर टेस्टमध्ये मतदानापासून रोखण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सेतुपती तिरुपत्तूर जागा एका मताने जिंकले. येथील पराभूत डीएमके उमेदवाराच्या याचिकेवर न्यायालयाने त्यांना मतदानापासून रोखले आहे.

विजय यांचा ओएसडी ज्योतिषी; ७१७ दारू दुकाने बंद करण्याचे आदेश

विजयने ‘रिकी राधन पंडित वेट्रिवेल’ यांची आपला विशेष कार्याधिकारी (आेएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेस खासदार ससिकांत सेंथिल म्हणाले, ‘समजत नाही ज्योतिषाला ओएसडी पद का हवे आहे?’ विजय सरकारने मंगळवारी राज्यभरात ७१७ दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही दुकाने मंदिरे, शाळा-महाविद्यालये आणि बस स्टँडजवळ आहेत. टीव्हीकेने कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी पोस्टर-बॅनर न लावण्याचे निर्देशही जारी केले आहेत.

उदयनिधी- सनातन विभागणी करतो, तो संपला पाहिजे

डीएमके आमदार आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानसभेत पुन्हा सनातनविरोधी विधान केले. ते म्हणाले, ‘सनातन धर्म लोकांना विभागतो, म्हणून तो संपवला पाहिजे.’ त्यांनी विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तमिळ राज्यगीत तिसऱ्या क्रमांकावर वाजवण्यावरही आक्षेप घेतला.

न्यायालयाने फटकारले होते

सप्टेंबर २०२३ मध्येही उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केली होती. त्यावरून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. सुप्रीम कोर्टाने मार्च २०२५ मध्ये त्यांना फटकारताना म्हटले होते की, उदयनिधी सामान्य नागरिक नाहीत. त्यांना आपल्या विधानाच्या परिणामांची कल्पना असायला हवी होती. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा वापर केला. भाजपने म्हटले की, अशा विधानांमुळेच डीएमकेची सत्ता गेली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *