Headlines

Rohit Pawar Warns Micro Finance Companies Over Farmer Suicide



मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारने यात लक्ष घातलं नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत राहतील. आम्ही वारंवार सरकारला सांगूनही सरकारला ऐकू येत नसेल तर हे सरकार झोपलंय का? असा सवाल राष्ट्रवादी क

.

दरम्यान रोहित पवारांनी पुढे बोलताना म्हटलंय की, मायक्रो फायनान्स कंपन्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कर्जवसुलीचं काम देतात आणि ते कर्ज वसुलीसाठी अक्षरशः लोकांची इज्जत घेतात, धमक्या देतात, छळ करतात. सरकारने याला वेळीच आळा घालावा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरवावं लागेल, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

रोहित पवारांची पोस्ट काय?

रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, मायक्रो फायनान्स कंपनीच्या 8-10 हजाराच्या कर्ज वसुलीसाठी नांदेडच्या माळकौठ्यात सदर कंपनीने शेतकऱ्याचा अनन्वीत छळ करून खून केल्याच्या घटनेपाठोपाठ आता परभणीतही मानवत तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून अवघ्या 32 वर्षीय लहू लाडाने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारने यात लक्ष घातलं नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत राहतील, असं आम्ही वारंवार सरकारला सांगूनही सरकारला ऐकू येत नसेल तर हे सरकार झोपलंय का? मायक्रो फायनान्स कंपन्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कर्जवसुलीचं काम देतात आणि ते कर्ज वसुलीसाठी अक्षरशः लोकांची इज्जत घेतात, धमक्या देतात, छळ करतात. सरकारने याला वेळीच आळा घालावा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरवावं लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

नांदेडात फायनान्स कंपनीने शेतकऱ्याला जिवे मारल्याचा आरोप

नांदेडमधील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मुदखेड तालुक्याच्या माळकवठा येथील शेतकरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कंपनीने कर्जवसुलीसाठी या शेतकऱ्याला दोन दिवस कार्यालयात डांबून जिवे मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. चंद्रकांत शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हाती न घेण्याचा पवित्रा नातलगांनी केला आहे.

तसेच कंपनीच्या कार्यालयासमोरही नातलगांनी आणि ग्रामस्थांनी शनिवारी ठिय्या मांडला. चंद्रकांत यांनी या कंपनीकडून 2 महिन्यांपूर्वी 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाचे 2 हप्ते भरले. मात्र, नापिकीमुळे पुढील हप्ते भरण्यास विलंब झाला. त्यामुळे चंद्रकांत यांना गुरुवारी जबरदस्तीने कंपनी कार्यालयात डांबून ठेवत मरेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *