मुंबईत हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना तुरुंगात जावे लागले, हे महाराष्ट्र विसरलेला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर भाजप प्रवक्ते नवनाथ
.
नवनाथ बन म्हणाले की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी देशभरातील संत-महंत, धर्माचार्य आणि लाखो रामभक्त अयोध्येत उपस्थित होते; मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवरच राहिले. काँग्रेसच्या दबावामुळे त्यांनी त्या ऐतिहासिक सोहळ्याला जाणे टाळले, असा दावा करत आता रामभक्तीचा आव आणण्यापेक्षा स्वतःचा पक्ष वाचविण्याची गरज आहे. राम मंदिर आंदोलनाच्या काळात “मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे” अशी खिल्ली उडवणारे आज रामरक्षा आंदोलनाची भाषा करत आहेत. हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्यांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जात काँग्रेसची साथ स्वीकारली. त्यामुळे राम मंदिराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांनी गमावला आहे.

ठाकरेंकडून राजकीय नौटंकी सुरू नवनाथ बन म्हणाले की, प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणे म्हणजे राजकीय नौटंकी आहे. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असे संबोधन करण्यासही लाज वाटणारे आज हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. यांना जनतेने पाठ फिरवल्यानंतर राम मंदिराची आठवण झाली आहे. हे आंदोलन रामभक्तांसाठी नसून स्वतःचा पक्ष आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे.प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित अपहार प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत मिळणार नाही. संबंधित आरोपींकडून प्रत्येक पैशाची वसुली करण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशीआम्ही मागणी आम्ही केली आहे.
सत्तेत असताना सुविधा का दिल्या नाही?
नवनाथ बन म्हणाले की, गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असतानाही सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा देता आल्या नाहीत. मराठी माणसाच्या घराचा प्रश्नही सोडविण्यात अपयश आले असे म्हणत बन यांनी राऊत आणि ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका केली. तर महायुती सरकारच्या काळात मुंबईत कोस्टल रोड, मेट्रोसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत. मराठी माणसाला त्याच परिसरात घरे देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राऊतांना बांगलादेशी-रोहिंग्यांविषयी सहानुभूती का?
नवनाथ बन म्हणाले की,राज्यात आणि मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या घुसखोरांविरोधात कारवाई होताच संजय राऊत आक्रमक का होतात? असा सवाल करत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधातील कारवाईवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली. घुसखोरीविरोधातील कारवाई ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाब असून त्यावर राजकारण करण्याऐवजी पाठिंबा द्यायला हवा. बांगलादेशी आणि रोहिंग्यांविषयी एवढी सहानुभूती का, याचे उत्तर संजय राऊत यांनी जनतेला द्यावे.
देशपांडेंना साटमांवर बोलण्याचा अधिकार नाही
नवनाथ बन म्हणाले की, अमित साटम यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर टीका केली जात आहे. अमित साटम हे संवेदनशील आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी असून त्यांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. स्वतःच्या पक्षात राजकीय अस्तित्व टिकविण्याचे आव्हान असताना इतरांवर टीका करण्यात अर्थ नाही. आधी स्वतःचा पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा आणि अमित साटम यांच्यावर वैयक्तिक टीका करणे थांबवावे असे म्हणत त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपा आमदार अमित साटम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
हे ही वृत्त वाचा
‘उबाठा’त फक्त उद्धव ठाकरे-संजय राऊतच उरणार:मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर सोबत कोण राहणार, संजय केनेकरांचा ठाकरेंना रोकडा सवाल

उबाठा पक्षाची सूत्रे आता उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांच्या हातात गेल्याचे दिसत असून, राऊत ठाकरेंना पूर्णपणे बुडवतील. मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांच्यासोबत कोण राहील, आगामी काळात या पक्षात केवळ ठाकरे आणि राऊत हे दोघेच शिल्लक राहतील आणि सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते पक्ष सोडतील, असा दावा भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर
महायुतीत विनायक मेटेंच्या पश्चात ‘शिवसंग्राम’ची उपेक्षा:अद्याप स्वबळाचा निर्णय नाही, पण…; कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास थोपवणे अवघड जाईल- ज्योती मेटे

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये शिवसंग्राम पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या हयातीत पक्षाला महायुतीत जो सन्मान आणि वाटा मिळत होता, तो आता त्यांच्या पश्चात मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि तीव्र नाराजी पसरली आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचे थेट परिणाम पाहायला मिळतील, असा इशारा ज्योती मेटे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर