![]()
रामनगर येथे अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या प्रांगणातच सरण रचल्याने गावात तणाव निर्माण झाला. हरणाबाई रामजी गायकवाड (८५) यांचे मंगळवारी निधन झाले. गावाचे पुनर्वसन होऊन २५ वर्षे उलटूनही दहन व दफन भूमीसाठी जागा उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. अखेर प्रशासनाने आश्वासन दिल्याने दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन : प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा रामनगरच्या ग्रामस्थांनी दिला आहे. मृत हरणाबाई यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. २५ वर्षे उलटूनही अंत्यविधीसाठी जागा नसल्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
Source link
अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रा.पं. समोरच रचले सरण:रामनगर येथील घटना, 25 वर्षे उलटूनही अंत्यविधीसाठी जागा नाही