![]()
अचलपूर आणि परतवाडा परिसरात मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आमदार रवी राणा यांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर लव्ह जिहाद करणाऱ्या आमच्या हिंदू मुलींना फसवून व्हिडिओ काढले अशा विकृतीला वेळ आली तर आमच्या ताब्यात द्यावे आम्ही त्याचा बंदोबस्त करू, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या कृत्याचा निषेध करताना रवी राणा म्हणाले की, ज्या जिहादी मानसिकतेतून हिंदू मुलींना फसवून त्यांचे व्हिडिओ काढले गेले, ते अत्यंत निंदनीय आहे. अशा नराधमाला जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांनी त्याची चांगली धुलाई केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे धाडस कोणाचेही होणार नाही. उद्याच्या अचलपूर बंदला माझे पूर्ण समर्थन आहे. अशा विकृतींना धडा शिकवण्यासाठी जनतेने एकत्र येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. नेमके प्रकरण काय? परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय नराधमाने विविध मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांचे व्हिडिओ तयार केले,फोटो काढले. त्यानंतर त्याने व त्याच्या मित्राने ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. या प्रकरणात एकही पिडीत तक्रार देण्यासाठी पोलिसांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी 13 एप्रिलला उशिरा रात्री स्वतःच तक्रार नोंदवून परतवाडा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी रात्रीपर्यंत दोघांना पकडले आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना आठ पिडीता निष्पन्न झाल्या आहेत. या नराधमांनी आक्षेपार्ह 18 व्हिडिओ, 39 फोटोविविध समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे ही आतापर्यंत निष्पन्न झाल्याचे एसपी विशाल आनंद यांनी सांगितले. अयान अहमद तनवीरअहमद (19, रा. परतवाडा) या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याचा मित्र उजैर खान इक्बाल खान (20, रा. परतवाडा)याला पोलिसांनी मंगळवारी 14 एप्रिलला सायंकाळी ताब्यात घेतले आहे. अयान अहमद याने मागील काही महिन्यांपासून विविध मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. त्या कृत्याचे त्याने व्हिडिओ तयार केले आहेत. पोलिसांनीच दिली तक्रार व्हिडिओ तयार केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. हे प्रकरण भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पोलिस अधीक्षकांसमोर पोहोचवले. तत्पूर्वी पोलिसांना या प्रकरणाची कुण कुणलागली होती. मात्र त्या प्रकरणात कोणीही तक्रार देण्यासाठी समोर आले नव्हते. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी स्वतः या प्रकरणात तक्रार दाखल केली. व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे पीडित मुली अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यामुळेच पोलिसांनी आरोपिवरुद्ध असभ्य वर्तनकरून व्हिडिओ तयार करणे, ते व्हायरल करणे, सोबतच पोक्सोच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला. अयानकडून तपासादरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला आहे. पोलिसांकडून दोघांना अटक काही व्हिडिओ अयानचा मित्र उजैर खान इक्बाल खान याने सुद्धा व्हायरल केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.पिडीता किंवा त्यांच्या नातेवाईकांनी निडरपणे तक्रार देण्यासाठी समोर यावे, पिडीतांना पोलिस ठाण्यात यायचे नसल्यास त्यांनी आम्हाला सांगावे, आम्ही त्यांची तक्रार ते म्हणतील,अशा गोपनीय ठिकाणी खासगी गणवेशातील महिला पोलिसांच्या माध्यमातून घेऊ.पिडीतांची ओळख पटणार नाही, याबाबत पुर्णत:गोपनीयता बाळगण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत,एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे उपस्थित होते.
Source link
अचलपूर व्हिडिओ प्रकरण:त्या नराधमाला जन्मठेपच झाली पाहिजे, कारवाई अशी करा की पुन्हा कोणी धाडस करणार नाही- रवी राणा