Headlines

अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने विषमतेवर हल्ला चढवला- जोगदंड:अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा‎




कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे समग्र लेखन वंचित, शोषितांच्या दमनाविरूद्ध उभे राहिले. त्यांच्या लेखणीने विषमतेवर हल्ला चढवला. हाच वारसा युवा पिढीने पुढे न्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी शिवाजी महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोगदंड बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, युवकांनी ‘फकीरा’ कादंबरीचा सखोल अभ्यास करून त्यांच्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार सारिका भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भगत म्हणाल्या की, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते जीवनमूल्य म्हणून स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. के. मगरे होते. यानंतर वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत एकूण ४१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. वक्त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे जीवनकार्य, साहित्य आणि विचारांवर प्रभावी मांडणी केली. स्पर्धेच्या माध्यमिक गटात प्रणिता प्रवीण काथार (साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, कन्नड) हिने प्रथम, आकांक्षा दलपत चव्हाण (श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, कन्नड) द्वितीय, संस्कृती नीलेश अकोलकर (कै. काशिनाथ पाटील विद्यालय, कन्नड) तृतीय क्रमांक पटकावला, तर सार्थक अविनाश पाखले (गौताळा व्हॅली स्कूल, कन्नड) या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. महाविद्यालयीन गटात पूजा प्रमोद चव्हाण (शिवाजी महाविद्यालय, कन्नड) प्रथम, तेजश्री राजेंद्र तारडे (सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, कन्नड) द्वितीय, मनीषा बंडू महेर (जिजामाता माध्यमिक विद्यालय, पिंपरखेडा) या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. प्रांजल मनोज महाकाळ (पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड) या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. संजय भालेराव यांनी केले. याप्रसंगी डॉ. संजय भालेराव, प्रा. काशीद उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *