Headlines

अधिक मासानिमित्त शहरात विष्णू याग, कीर्तन सोहळा अन् नेत्रचिकित्सा शिबिर:समाजाच्या विकासासाठी अध्यात्म, समाजसेवा आवश्यक- आ.जगताप‎




प.पू. अमळनेरकर महाराज सेवा समितीच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित नऊकुंडी श्री विष्णू याग, कीर्तन सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ बंधन लॉन्स येथे भक्तिमय वातावरणात झाला. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक महेश लोंढे उपस्थित होते. शिबिरात २०० हून अधिक नागरिकांनी नेत्रतपासणी करून घेतली. “समाजाच्या विकासासाठी अध्यात्म आणि समाजसेवा आवश्यक आहे. धार्मिक कार्यक्रमातून संस्कार जपले जातात, तर आरोग्य शिबिरांमुळे गरिबांना मदत होते. समितीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे आमदार जगताप म्हणाले.सोहळ्याच्या पहिल्या दिवशी वैदिक मंत्रोच्चारात विष्णू यागाला प्रारंभ झाला. तसेच ह.भ.प. प्रसाद महाराज यांची तुला व वायनदान करण्यात आले. देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते संतपूजन झाले, तर ह.भ.प. महेश जोशी महाराज यांचे प्रवचन आणि सामूहिक हरिपाठ पार पडला. रात्री ह.भ.प. ऋषिकेश महाराज खोसे यांचे कीर्तन झाले. आगामी काळातही विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे. सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय वातावरण कार्यक्रमाच्या प्रारंभी वैदिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात नऊकुंडी श्री विष्णू यागाला प्रारंभ करण्यात आला. यागस्थळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. अधिक मास हा अध्यात्म, साधना आणि दानधर्मासाठी महत्त्वाचा मानला जात असल्याने या काळात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले. महंत प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते संतपूजन; महेश जोशी महाराजांचे अभ्यासपूर्ण निरूपण केले. ह.भ.प. प्रसाद महाराज यांचा तुला सोहळा आणि सामूहिक हरिपाठ व कीर्तनाला भाविकांची अलोट गर्दी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *