Headlines

अन्वी फाट्याजवळ बस नालीमध्ये घसरली; 7 प्रवासी किरकोळ जखमी:सारोळ्याहून सिल्लोडकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात‎




पालोद-अन्वी फाट्यावरील महानुभाव आश्रमाजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील नालीत घसरली. या अपघातात बसमधील ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथून अन्वीमार्गे सिल्लोडकडे येत असलेली एसटी बस (एम.एच. २९ बीएल १६२१) अन्वी फाट्याजवळील वळणावर आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे बस थेट रस्त्याखाली उतरून नालीत गेली. या अचानक झालेल्या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अपघातावेळी बसमध्ये एकूण ७ प्रवासी होते. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींनी खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन घर गाठल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक अधिकारी हरी ओम शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तांत्रिक बिघाड झाल्याने बसवरील ताबा सुटला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *