Headlines

लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी नगर परिषद वचनबद्ध- फरीन बेगम:पीएम स्वनिधी योजनेंतर्गत 150 लाभार्थींना 25 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण‎




महिला आणि लघुउद्योजकांना सक्षण करण्यासाठी नगर परिषद वटनबद्ध आह . हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक नगरपालिकेने पुढाकार घेतला असून शहरातील जास्तीत जास्त महिला व व्यावसायिकांनी या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कन्नडच्या नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी केले. कन्नड नगर परिषदेच्या वतीने येथील महिला प्रबोधिनी सभागृहात विशेष स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पीएम स्वनिधी योजनेंतर्गत १५० लाभार्थींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या धनादेशांचे (चेक) वितरण नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित लाभार्थींना संबोधित करताना त्या बोलत होत्या. फरीन बेगम म्हणाल्या की, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली ‘पीएम स्वनिधी योजना’ महिला आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक सक्षमतेकडे घेऊन जाण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. या महोत्सवाला अब्दुल रहमान सिद्दिकी, ज्योती शेजवळ, निलोफर शबनम शहेबाज, इम्रान इब्राहिम शेख, सीमा समद खान पठाण, नजमा अमिरुद्दीन शेख, सय्यद सोहेब अली, लियाकत अली, छाया रवींद्र पाटील, मलिक रफिक शेख, रामेश्वर एकनाथ नागरे, नगरसेवक संदीप घोंगते, नगरसेवक अब्दुल अजीज शेख, नगरसेवक तारेख सेठ आरजी, अब्दुल रऊफ मामू, सुनील पवार, वर्षा ताठे यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक चंद्रकांत खिल्लारे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक मीना कुमार आणि मुकुंद कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विद्या प्रवीण काशिनंद यांनी मानले. या सोहळ्याला राजू कमिटी शेख, ज्ञानेश्वर बोरसे, विजय सिरसाठ यांच्यासह नागरिक व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते. लाभार्थींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मिळालेल्या या आर्थिक निधीचा वापर लाभार्थींनी स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी करावा. यामुळे केवळ स्वतःची प्रगती होणार नाही, तर स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होईल. रवींद्र लांडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कन्नड येथील ज्या नागरिकांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक अब्दुल जावेद व सुरेश डोळस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *