![]()
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शहरात ‘अभिजात मराठी भाषा संमेलन’ शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वसंत सभागृहात होणार आ
.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लोणी आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे भूषवणार आहेत. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पुंडकर, श्री शिवाजी महाविद्यालय विकास समितीचे प्रा. सुरेश राऊत आणि प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मराठी विश्वकोश मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ. जगतानंद भटकर, मराठी विभागप्रमुख डॉ. संजय पोहरे व वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन सत्रात प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच मराठी विश्वकोशात उल्लेखनीय नोंदींचे योगदान दिल्याबद्दल प्रा. डॉ. बाळासाहेब जोगदंड, डॉ. उमेश घोडेस्वार व प्रा. दिवाकर सदाशिव यांचा संमेलन अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याचा हा उत्सव अनुभवण्यासाठी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, वाचक, लेखक व मराठी भाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवाजी महाविद्यालय परिवार आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण एच. कुलकर्णी यांनी केले आहे.
पन्नासहून अधिक कवी करणार सादरीकरण राज्यभरातील ५० हून अधिक कवींचे कवी संमेलन दुपारी ३.३० ते ५.३० वाजता ज्येष्ठ कवी प्रशांत असनारे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, वर्धा, धुळे, वाशीम, शेगाव, खामगाव, अमरावती व अकोला परिसरातील ५० हून अधिक निमंत्रित कवी रचना सादर करतील. सूत्रसंचालन किशोर बळी व गोपाल मापारी करणार आहेत. समारोप सत्र सायंकाळी ५:३० ते ६ वाजता होऊन संमेलनाचा समारोप सायंकाळी ५:३० वाजता प्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक पुष्पराज गावंडे यांच्या अध्यक्षतेत आणि संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.