Headlines

अमरावतीत अत्याचार:मित्रांमध्ये "फुशारकी’ मारण्यासाठी मुलींना अयानने ओढले जाळ्यात, 18 हजार फॉलोअर्स असलेल्या ब्लॉगरचा "ट्रॅप’




सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुलींशी मैत्री करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा
धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात नुकताच समोर आला आहे. केवळ मित्रांमध्ये आपली ‘मर्दानगी’ सिद्ध करण्यासाठी आणि फुशारकी मारण्यासाठी १९ वर्षीय ब्लॉगर अयान तन्वीर हे कृत्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी तो एका मित्राच्या भाड्याच्या खोलीचा वापर करत होता. त्याच्या मित्राने खोली भाड्याने घेतली होती. मात्र, अयान त्याला प्रत्येक वेळी ५०० रुपये देऊन ती खोली काही वेळासाठी वापरत असे. आरोपी अयान सोशल मीडियावर ब्लॉगर म्हणून सक्रिय असल्याने त्याने जवळपास १७ ते १८ हजार फॉलोअर्स तयार केले होते. याच माध्यमातून त्याने काही मुलींना जाळ्यात ओढले. मित्राने डेटा मोबाइलमध्ये घेतल्याने व्हिडिओ व्हायरल या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अयानच्या जिवलग मित्रामुळेच झाला. अयान आणि उजेर हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे जिवलग मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी ते चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी अयान आपला मोबाइल उजेरकडे देऊन काही वेळासाठी बाहेर गेला. उजेरला अयानच्या मोबाइलचा पासवर्ड माहीत होता. त्याच वेळी उजेरने अयानच्या सोशल मीडिया अकाउंटमधील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओंचा ॲक्सेस स्वतःकडे घेतला आणि तो आक्षेपार्ह सर्व डेटा आपल्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर उजेरने हे फोटो, व्हिडिओ एका मित्राला पाठवले, तिथून ते दुसऱ्याकडे आणि अशा प्रकारे अनेकांपर्यंत हे व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच अयानच्या या कृत्याचे बिंग फुटले. मेळघाटातील महाविद्यालयात घेत आहे बीएस्सीचे शिक्षण अयान हा मेळघाटच्या महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय होता. तो कुठेही गेला तरी त्याचे ब्लॉग तयार करून सोशल मीडियावर अपलोड करणे, हा त्याचा नित्यक्रम होता. या ब्लॉगमुळे त्याचे जवळपास १७ ते १८ हजार फॉलोअर्स झाले होते. यात अनेक मुलींचा समावेश होता. त्याच्या ब्लॉगला कोणी लाइक केले, त्यावर कमेंट केली की, अयान त्यांना हेरायचा. अशा मुलींना रिप्लाय देऊन तो सुरुवातीला चॅटिंग करायचा. मुलींच्या संमतीविना काढलेले ३९ आक्षेपार्ह फोटो आरोपीकडे १८ व्हिडिओ : अयानने आपल्या विकृत आनंदासाठी आणि मित्रांना दाखवण्यासाठी मुलींचे १८ आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केले.
३९ फोटो : पीडित मुलींच्या संमतीविना काढलेले ३९ आक्षेपार्ह फोटो आरोपीने आपल्या मोबाइलमध्ये साठवून ठेवले होते.
८ तरुणी : ब्लॉगिंगच्या माध्यमातून जाळ्यात ओढलेल्या एकूण ८ तरुणी अयानच्या या विकृत मानसिकतेच्या शिकार झाल्या. २ मुलींवर लैंगिक अत्याचार, आठ जणींसोबत गैरवर्तन अयानने आठ मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे समोर आले आहे, तर व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरून त्याने २ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मुलगी जाळ्यात आल्यानंतर तिला परिसरातील धरणावर किंवा आजूबाजूच्या निर्मनुष्य परिसरात, कॅफेवर दुचाकीवरून फिरायला नेणे किंवा कधी अमरावतीला आणणे आणि तिथे गैरवर्तन करणे, असा त्याचा नित्य कार्यक्रम होता, असेही तपासामध्ये समोर आले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान आणि परतवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी-कर्मचारी एकत्रित येवून केक कापतानाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत परतवाडा ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना तत्काळ मुख्यालयात संलग्न (अटॅच) केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *