Headlines

अमरावती शहरातील प्रमुख चौक आता लख्ख प्रकाशाने उजळणार:आमदार सुलभा खोडके यांनी पाहणी करुन दिले योग्य निर्देश‎




शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अतिवर्दळीच्या राजकमल चौक ते अंबागेट आणि गांधी चौक ते जवाहर गेट या रस्त्याची व परिसराची आमदार सुलभा खोडके यांनी शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रोजी पाहणी केली. दरम्यान सद्याची परिस्थिती व विकासात्मक उपाययोजनांचा आढावा घेत त्यांनी हा परिसर वाहतुकीसाठी सुटसुटीत करुन येत्या काळात लख्ख प्रकाशाने उजळवण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेचे निवडक पदाधिकारी व अधिकारी तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेत आमदारांनी पाहणी केली. पाहणीअंती सदर परिसर व रस्त्यांवर डेकोरेटिव्ह विद्युत पोल बसविणे तसेच रस्ता काँक्रीटीकरण, नाली बांधकाम अशा अनेक विकास कामांचा गती देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या आकर्षक व दर्जेदार विद्युतीकरणामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सदर कामांसाठी आमदारांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सदर भागात पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. या अंतर्गत पवार फोटो स्टुडिओ समोरील गांधी चौक नमूना गल्ली पोच रस्त्याचे काँक्रीटीकरण, राजकमल चौक ते अंबागेट व गांधी चौक ते जवाहर गेट पर्यंत डेकोरेटिव्ह विद्युत पोल बसवणे, प्रभाग क्रमांक १४ बुधवारा येथील टायगर चौक ते कैची धार गल्लीचे काँक्रीटीकरण, नालीचे बांधकाम, जवाहर गेट ते बर्तन बाजार ते बुधवारा परिसरात डेकोरेटिव्ह पोल व एलईडी लाईट आदी विकास कामांचा समावेश आहे. सदर कामांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उच्च दर्जा राखण्याचे, विद्युतीकरण आधुनिक व सुरक्षित पद्धतीने करण्याचे तसेच नागरिकांना दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. या विकास कामांमुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार असून वाहतूक, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार खोडके यांच्यासमवेत शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, कर्नलसिंह राहल, नगरसेविका लविना हर्षे व स्वाती कुलकर्णी, मनपा उपअभियंता विवेक देशमुख, कनिष्ठ अभियंता लक्ष्मण पावडे, विद्युत विभागाचे अधीक्षक शरद तिनखेडे, महेंद्र भूतडा, वसंत कलंत्री, राजू अग्रवाल, राजू चुडीवाले, रामेश्वर उपाध्याय, नरेश शिंदे, सचिन शर्मा, पिंटू शर्मा, पवन पितलिया, मनीष चौबे, श्यामराव टोपे, अनिल पुरोहित, विशाल कुलकर्णी, सोनू व्यास, सत्यजीत अग्रवाल, विवेक पवार, मनोज केवले, निलेश शर्मा, भास्कर ढेवले, आनंद बुंदेले, अमन गुप्ता, रोहित संगेले, अभी गाडेकर, गणेश वर्मा आदींसह या भागातील नागरिक उपस्थित होते. तात्पुरत्या नव्हे, दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधा द्या अमरावती शहरातील राजकमल चौक, गांधी चौक, अंबागेट, जवाहर गेटचा परिसर शहराच्या अगदी मध्यभागी आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील अनेकांचे कुळदैवत असलेल्या अंबादेवी-एकविरादेवीच े मंदिरही येथेच आहे. शिवाय या व्यवसायिक परिसराला लागून रहिवासी भाग असल्यामुळे या भागात नेहमीची नागरिकांची मोठी वर्दळ असते. म्हणूनच तात्पुरत्या सुविधा निर्माण न करता दीर्घकालीन उपाययोजना व गुणात्मक कामे करण्याचे ठरविण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *