Headlines

अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर:'सिंदूर' उपक्रमांसह सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती, राजकीय चर्चांनाही उधाण




मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शनिवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट दिल्लीच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्यात ते क्रांती दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईतील बंद दाराआडच्या राजकीय खलबतांनंतर शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रम आणि वेळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन प्रामुख्याने सामाजिक उपक्रम आणि मराठी अस्मितेवर आधारित आहे. दुपारी १२ वाजता दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरातील बेस हॉस्पिटलमध्ये शिवसेनेच्या वतीने ‘सिंदूर महारक्तदान यात्रा आणि शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला शिंदे प्रत्यक्ष भेट देणार आहेत. सायंकाळी ४ वाजता मिंटो रोडवरील केदारनाथ साहनी सभागृहात ‘सिंदूर आर्मी’ने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना ते संबोधित करतील. याच सभागृहात ‘अभिमान मराठी, अभिजित मराठी’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमालाही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचे राजकीय महत्त्व क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमांमधून शिवसेनेने राजधानी दिल्लीत एक प्रकारे आपले सामाजिक शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या दौऱ्याची चर्चा वेगळ्या कारणासाठी होत आहे. अवघ्या एक दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली होती. या भेटीच्या लागलीच दुसऱ्या दिवशी शिंदेंनी दिल्ली गाठल्याने, आगामी राजकीय रणनीती आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हेही वाचा.. मुंबईमध्ये एनयूसीएफडीसीच्या कार्यालयाचा शुभारंभ:एनयूसीएफडीसीचे मुख्यालय महाराष्ट्रात हलवणार, सहकारमंत्री शहा यांची घोषणा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी नागरी सहकारी बँकांना (यूसीबी) रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत आरबीआयने सहकार क्षेत्राला मोठी मदत केली असून आता वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’चे (एनयूसीएफडीसी) मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा शहा यांनी शनिवारी केली. सविस्तर वाचा ‘उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी एकनाथ शिंदेच दिसतात!’:शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? रामदास कदम यांचा पलटवार “उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसतात,” अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली असून, शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती, तेव्हा पंतप्रधान तुमचे बॉस झाले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटू शकतो, हे स्पष्ट करतानाच, तुम्ही गद्दार म्हणत राहा, तुमचा पक्ष संपतोय आणि शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, असा सणसणीत टोलाही रामदास कदम यांनी ठाकरेंना लगावला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *