सरकार जसा त्रास मराठा समाजाचे खरे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे, तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्य
.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची चूक चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरच टीका करणार. उगाच यामध्ये छगन भुजबळ यांना का ओढणार? पण भुजबळांनी चूक केली तर त्यांनाही मी सोडणार नाही. बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून जे करायला नको होते तेच केले. एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या संजय शिरसाट यांनी मराठ्यांचे वाटोळे केले. उदय सामंत, शंभूराज देसाई किंवा प्रसाद लाड यांनी एकट्याने मराठा समाजासाठी कितीही काम केले तरी त्याचा फायदा होणार नाही.
त्या दोघांना काय कळंत?- जरांगे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे एखादा मोठा राजकीय नेता असल्याचा दावा करत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर निशाणा साधत काल एक गाणेही गायले होते. या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांना या विषयातील काय कळते? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या दोघांवरही निशाणा साधला.
‘मी जिवंत असेपर्यंत एकही नोंद रद्द होऊ देणार नाही’
मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही कोणाचे काही हिसकावून घेतले नाही, तर आमच्या हक्काचे घेतले आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत एकही कुणबी नोंद रद्द होऊ देणार नाही. बावनकुळेंनी आमच्या नादी लागू नये, मी जर एकदा बोकांडी बसलो तर सहजासहजी उठणार नाही. सत्तेतील लोकांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली आहे. तुमचा हा माज उतरवला नाही तर माझे नाव जरांगे पाटील नाही.
29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक
मनोज जरांगे म्हणाले की, राज्यातील मराठा समाज आता पूर्णपणे जागा झाला असून मोठी लाट उसळली असल्याचे सांगत, जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन सुरू होणार आहे, या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
हे ही वृत्त वाचा
मराठा समाजाला मागास उपवर्गाचे स्वतंत्र आरक्षण शक्य- राज्य सरकार:50% मर्यादा ओलांडणे शक्य; मराठा आरक्षणासाठी सरकारचा युक्तिवाद

विशेष परिस्थितीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे घटनात्मकदृष्ट्या शक्य असल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयासमोर सांगितले. मराठा आरक्षणाविषयीच्या याचिकांवर सुनावणीत महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. त्यात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती (एससी), जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील उपवर्गीकरणाला दिलेल्या ऐतिहासिक मान्यतेचा आधार घेण्यात आला. त्या आधारे मराठा समाजालाही मागास उपवर्ग म्हणून स्वतंत्र आरक्षण देणे कायदेशीरदृष्ट्या शक्य असल्याचे मत साठे यांनी मांडले. वाचा सविस्तर
जरांगेंच्या आंदोलनामागे प्रसाद लाड, त्यांनीच पैसा पुरवला:मुख्यमंत्र्यांचा बाप काढला तेव्हा लाड गप्प का? लक्ष्मण हाकेंचा सवाल

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे भाजप आमदार प्रसाद लाड हेच असून त्यांनीच हे वातावरण तापवले आहे, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनीच मनोज जरांगे यांना पैसे पुरवले आहेत, असा थेट आरोप करत त्यांनी लाड यांच्यावर आक्रमक हल्लाबोल केला. वाचा सविस्तर