Headlines

अवाजवी शुल्कवाढ तातडीने कमी करा:एआयएसएफची कुलगुरुंना मागणी; मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा




संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध परीक्षा आणि शैक्षणिक शुल्कांमध्ये केलेली अवाजवी वाढ तातडीने कमी करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) ने केली आहे. सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही एआयएसएफने दिला आहे. विद्यापीठ प्रशासनाने डुप्लिकेट मार्कशीट, मायग्रेशन सर्टिफिकेट, डिग्री, अग्रेशन सर्टिफिकेट तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित अन्य शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. या वाढीमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडत असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, दर दोन वर्षांनी नियमानुसार १० टक्के शुल्कवाढ करण्याची तरतूद असताना, विद्यापीठाने त्यापेक्षा अधिक वाढ केली आहे. विशेषतः डुप्लिकेट मार्कशीट आणि मायग्रेशन सर्टिफिकेटसारख्या आवश्यक कागदपत्रांचे शुल्क वाढविल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. कुलगुरुंशी झालेल्या चर्चेदरम्यान, विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून वाढीव शुल्क तातडीने कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांनी मागणी मान्य न झाल्यास एआयएसएफच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, योगेश चव्हाण आणि शुभम शेरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. याव्यतिरिक्त, विद्यापीठात पीएम-उषा योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या क्रीडा विभागाच्या नूतन इमारतीला महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. प्रा. कैलास चव्हाण यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला असून, खाशाबा जाधव यांचा संघर्ष आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *