Headlines

अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन, न्यायव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान:गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम‎



अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात शिक्षण, शेती, न्यायव्यवस्था व प्रशासन व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय योगदान देऊन जनकल्याणाची महत्त्वपूर्ण कामे केली. म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेका

.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अहिल्यादेवींनी संस्कृत शिक्षणाला मोठे प्रोत्साहन दिले. वेद, पुराणे, धर्मशास्त्र आणि भारतीय संस्कृतीच्या अध्ययनासाठी त्यांनी विद्वानांना आश्रय दिला. अनेक पंडित, कवी आणि अभ्यासकांना त्यांनी आर्थिक मदत दिली. शेतीच्या विकासासाठी त्यांनी विहिरी, तलाव, घाट आणि पाण्याच्या साठवणुकीची कामे केली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीकाठांवर घाट आणि जलव्यवस्था उभारली. दुष्काळ व नैसर्गिक संकटांच्या काळात शेतकऱ्यांना करसवलत आणि आर्थिक मदत केली. अहिल्यादेवींनी देशात अनेक ठिकाणी मंदिरे, घाट आणि धर्मशाळा बांधल्या. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. तसेच सोमनाथ, गया, उज्जैन, नाशिक, अयोध्या व द्वारका अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला. प्रवाशांसाठी धर्मशाळा आणि अन्नछत्रांची व्यवस्था केली. यावेळी बीए, बी.कॉम भाग एक मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका हर्षदा गायकवाड यांनी केले, तर आभार सिद्रामप्पा पाटील यांनी मानले. कुमार जाधव, नागिनी सुतार, जयश्री वाले उपस्थित होते.

अहिल्यादेवींना लोकमाता व पुण्यश्लोक या पदव्या आदर व निष्ठेमुळे जनतेने दिल्या अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायव्यवस्था आणि प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याने प्रेरीत झालेल्या जनतेने त्यांच्याप्रती असलेला आदर व निष्ठेमुळेच त्यांना लोकमाता आणि पुण्यश्लोक पदवीने सन्मानित केले. – मल्लिनाथ कल्याणशेट्टी,



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *