![]()
अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न असलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळा झालेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन खोडा घातला आहे. “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंट
.
पूर्वी सोलापूर विभागात असलेले अहिल्यानगर दोन वर्षांपूर्वी पुणे विभागात समाविष्ट झाले, मात्र दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. या रेल्वेसाठी सोलापूर विभागात तब्बल ३६ वेळा बैठका आणि चर्चा झाल्या, पण आश्वासनापलीकडे नगरकरांच्या पदरी काहीच पडलेले नाही. आता हडपसर जंक्शन पूर्ण झाल्यानंतरच ही रेल्वे सुरू होईल, असे सांगून रेल्वे प्रशासनाने नगरकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची क्रूर चेष्टा सुरू केली आहे.
कागदी घोडे नाचवण्यात आले;
२० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात
२०१२ पासून नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याबाबत काँग्रेसचे 1. पहिला अडथळा (कॉर्डलाईनचा अभाव): सुरुवातीला दौंड स्थानकावर इंजिन बदलण्यासाठी कॉर्डलाईन नसल्याचे मुख्य कारण सांगण्यात आले. 2. दुसरा अडथळा (नवीन प्लॅटफॉर्म): २० कोटी रुपये खर्च करून ७ किलोमीटरची कॉर्डलाईन तयार झाल्यानंतर शिवाजीनगर स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्म नसल्याचे कारण पुढे आले. 3. तिसरा अडथळा (दुहेरीकरण): प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण झाले नसल्याचे कारण रेल्वेने समोर केले. 4. चौथा अडथळा (विद्युतीकरण): दुहेरीकरणाचा टप्पा अंतिम टप्प्यात येताच, या मार्गावर विद्युतीकरण झाले नसल्याची नवी सबब शोधण्यात आली. 5. पाचवा अडथळा (तिकीट घर): विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी तिकीट घर उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. 6. सहावा अडथळा (शिवाजीनगर प्लॅटफॉर्म थांबा): तिकीट घर तयार झाल्यावर शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर या इंटरसिटीसाठी प्लॅटफॉर्म (थांबा) मिळत नसल्याचे कारण पुढे केले गेले. 7. सातवा अडथळा (हडपसर जंक्शनचा नवा खोडा): हे सर्व अडथळे पार पडल्यानंतर आता “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होऊ शकत नाही, हा नवीनच ब्रेक रेल्वेने लावला आहे.
इंटरसिटी रेल्वेने सहा अडथळ्यांची शर्यत केली पार; पण सातवा खोडा ठरणार मोठी डोकेदुखी
केवळ आश्वासनांचा खेळ सुरू “नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे नगरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. १३ वर्षांपासून आमचा यासाठी पाठपुरावा सुरू आहे, मात्र केवळ आश्वासनेच दिली जातात. सध्या नगरहून वाघोलीपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा अधिक वेळ (तब्बल २ तास) वाघोलीतून पुण्यात जाण्यासाठी लागत आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास कमी वेळेत सुखकर प्रवास शक्य होईल.” – हरजीत वधवा, माजी सदस्य, रेल्वे सल्लागार समिती.