![]()
दुष्काळी परिस्थिती आणि कमी पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आधुनिक आणि नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत आणि कमी देखभालीतही चांगले उत्पादन देणाऱ्या ड्रॅगन फ
.
ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यावर येणारे आणि अधिक नफा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. या पिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची गरज नसून प्रामुख्याने शेणखताचा वापर केला जातो. तसेच रोग आणि कीड नियंत्रणासाठी फक्त एक ते दोन फवारण्या पुरेशा ठरतात, ज्यामुळे उत्पादन खर्च आणि देखभाल खर्च तुलनेने कमी राहतो.
लागवडीनंतर साधारण दीड वर्षांनी पहिले उत्पादन सुरू होते. पहिल्या वर्षात प्रतिएकर सहा ते सात टन उत्पादन मिळत असून, बाजारात या फळाला प्रतिटन सरासरी ८० ते ८५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. विशेष म्हणजे, एकदा फळधारणा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत चार वेळा फळांची तोडणी करता येते. आरोग्याच्या दृष्टीनेही ड्रॅगन फ्रूट अत्यंत लाभदायी मानले जाते; शुगर आणि रक्तदाब नियंत्रणासाठी हे फळ उपयुक्त असल्याने बाजारात त्याला मोठी मागणी आहे.
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, हेक्टरी सुमारे २ २ लाख ६० हजार रुपयांचे भरघोस अनुदान उपलब्ध आहे. यामुळेच तालुक्यातील शेतकरी या फळबाग शेतीकडे आकर्षित होत आहेत. दुष्काळी परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य पीकपद्धतीचा अवलंब करून करमाळा तालुक्यातील शेतकरी आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग शोधत असल्याचे या ड्रॅगन फ्रूट शेतीमुळे स्पष्ट होत आहे. कमी देखभालीत लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे हे पीक आगामी काळात तालुक्यातील कृषी अर्थकारणाला नवीन गती देणारे ठरेल.
निंभोरे, सौंदे, केम, मांजर गावात ड्रॅगन फ्रूटचा विस्तार, असा येतो लागवडीखर्च तालुक्यातील निंभोरे येथे जवळपास १०० एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली असून, तसेच सौंदे, केम, मांजरगाव आदी भागांमध्येही या ड्रॅगन फ्रूट बागेची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. या आधुनिक पिकाच्या लागवडीसाठी दोन पद्धती वापरल्या जातात. पोल-प्लेट पद्धत: या पद्धतीने लागवड केल्यास प्रतिएकर सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च येतो. ‘वाय’पद्धत: या आधुनिक पद्धतीने लागवड केल्यास हा खर्च सुमारे साडेपाच लाख रुपयांपर्यंत जातो.
तालुक्यात ऊस, केळीऐवजी शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळला ^करमाळा तालुक्यात साधारणपणे सरासरी दीडशे हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागण केली असून या ड्रॅगन फ्रूटला बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कमी पाण्यावर येणारे आणि जास्त उत्पन्न देणारे हे पीक असून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी ऊस, केळी करण्याचे ऐवजी भरपूर प्रमाणामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळलेला आहे. — नानासाहेब गायकवाड (उप-तालुका कृषी अधिकारी, करमाळा)