Headlines

भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत- काळे:पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी‎




भीमा नदीवरील सध्याचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गळतीमुळे कुचकामी ठरत असून, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत, अशी मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी राज्याचे ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी काळे यांनी त्यांना तालुक्याच्या सिंचन प्रश्नाबाबत सविस्तर निवेदन दिले. यामध्ये पाण्याची गळती आणि टंचाई सध्या अस्तित्वात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता कमी आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळतीमुळे उन्हाळ्यात नदी कोरडी पडते. सोलापूर शहरासाठी समांतर दुसरी जलवाहिनी सुरू झाल्यानंतर भीमा नदीत उजनीतून सोडले जाणारे पाणी बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याप्रसंगी सीताराम साखर कारखान्याचे संचालक महादेव देठे, सहकार शिरोमणीचे व्हा. चेअरमन भारत कोळेकर, जोतीराम पोरे, विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, शहाजी साळुंखे, विलास काळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख संचालक, नगरसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांची सकारात्मक भूमिका उजनी धरणासाठी जमिनी देणाऱ्या विस्थापित शेतकऱ्यांचे पुनर्वसन पंढरपूर तालुक्यात झाले आहे. नदीच्या पाण्यावर हक्क असतानाही त्यांना सिंचनासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली असून, शासन स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *