Headlines

आंबे गावात विजेच्या धक्क्यातून पतीला वाचवताना पत्नीचाही अंत:वटपौर्णिमेदिवशीच घाला, माेटार सुरू करण्यासाठी गेला होता शेतकरी‎




प्रतिनिधी | आंबे सात जन्माच्या सोबतीचे व्रत असणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशीच आंबे गावात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना सोमवारी घडली. सकाळच्या सुमारास शेती पंपाची मोटर बंद करताना विजेचा धक्का लागलेल्या पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत मोटारीला चिकटलेल्या पतीला वाचवायला गेलेल्या पत्नीलाही विजेने कचाट्यात घेतल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या सणादिवशी सकाळच्या प्रहरी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शेतकरी लक्ष्मण नागणे (वय ६०) हे भीमा नदीकाठी असलेला शेती पंप बंद करण्यास सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी अलका नागणे (वय ५५) होत्या. मोटर बंद करण्यासाठी पेटीला हात लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. अलका यांना लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली. लोक मदतीला येईपर्यंत कसलाही विचार न करता पतीला बाजूला करताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात पती-पत्नीचा एकाच वेळी मृत्यू झाला. {शेती पंपाच्या मुख्य पॅनलमध्ये रेसिड्यूल करंट सर्किट ब्रेकर किंवा अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. यामुळे मोटारीत किंवा वायरमध्ये थोडा जरी करंट उतरला, तर वीज पुरवठा आपोआप खंडित होतो आणि जीव वाचतो. {ओलाव्यामुळे अर्थिंग नीट नसेल तर करंट थेट मोटारीच्या बॉडीमध्ये उतरतो. पंपाची अर्थिंग योग्य आहे की नाही, हे पावसाळ्यापूर्वीच तंत्रज्ञांकडून तपासून घ्यावे. { वायरला कुठेही उघडे जॉइंट्स असू देऊ नका. असल्यास त्यावर चांगल्या दर्जाची वॉटरप्रूफ इन्सुलेशन टेप गुंडाळा. शक्यतो पावसाळ्यात अखंड केबलचा वापर करावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *