Headlines

आषाढी यात्रा:इसबावीतील पुलाचे अर्धवट काम पाहून संतप्त पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना




“आषाढी यात्रा तोंडावर आलेली असताना इसबावी येथील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण कसे? ठेकेदाराकडे पुरेशी यंत्रसामग्री का नाही? अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत “संबंधित ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करा,” असे कडक आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी पाहणीवेळी प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी स्वतः जागेवरूनच थेट दुसऱ्या ठेकेदाराला फोन लावला चालू ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या. रविवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाखरी पालखीतळ, ईसबावी आणि ६५ एकर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. ईसबावी येथील मलपे ओढ्यावरून आगमन होते. त्यामुळे हा पूल वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत काम अर्धवट असल्याचे आणि काम करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याचे समोर आले. यावरून पालकमंत्र्यांनी कडक पावले उचलत संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी इथापे उपस्थित होते. पंढरपूर शहरात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार प्रमुख यात्रांबरोबरच शनिवार, रविवार आणि सुट्यांच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री गोरे म्हणाले, “नुकतेच स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले आहे. स्वतंत्र वाहतूक पोलिस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शासनाकडे पाठवला आहे. तो लवकरच मंजूर केला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *